रणवीर सिंगचा धसका घेऊन सलमान खानने 'दबंग3'ची रिलीज डेट पुढे ढकलली ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 3, 2018 13:16 IST2018-04-03T06:44:47+5:302018-04-03T13:16:34+5:30

गतवर्षी आपण  बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे क्लैशस बघितले. दिवाळीत रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन आणि आमिर खान स्टारर सीक्रेट सुपरस्टार ...

Salman Khan dares to release 'Dabangg3' release date with Ranveer Singh | रणवीर सिंगचा धसका घेऊन सलमान खानने 'दबंग3'ची रिलीज डेट पुढे ढकलली ?

रणवीर सिंगचा धसका घेऊन सलमान खानने 'दबंग3'ची रिलीज डेट पुढे ढकलली ?

वर्षी आपण  बॉक्स ऑफिसवर अनेक चित्रपटांचे क्लैशस बघितले. दिवाळीत रोहित शेट्टीचा गोलमाल अगेन आणि आमिर खान स्टारर सीक्रेट सुपरस्टार या दोघांची टक्कर झाली होती. हाच संघर्ष टाळण्यासाठी सलमान खानने त्याचा आगामी चित्रपट 'दबंग 3'ची रिलीड डेट पुढे ढकलली आहे. या मागचे कारण आहे रणवीर सिंहचा चित्रपट सिम्बा. सलमान खानच्या 'दबंग3'सोबत सिम्बादेखील रिलीज होणार होता. 

सलमान खान स्टारर दबंग चित्रपट अरबाज आणि सलमानला या वर्षाच्या अखेरीस रिलीज करायचा होता. मात्र रोहित शेट्टीने सिम्बाची रिलीज डेट फायनल केली आहे. सिम्बा 28 डिसेंबरला रिलीज होणार आहे. सलमानने पद्मावतमधला रणवीर सिंगचा जबदरस्त अभिनय बघितल्यानंतर बॉक्स ऑफिसवरील मेगाक्लैशस टाळण्यासाठी रिलीज डेट पुढे ढकलली असल्याचे समजते आहे. मिळालेल्या माहितीनुसार सलमान खानचा 'दबंग3' 2019मध्ये 26 जानेवारीला रिलीज करण्यात येणार आहे.  

सध्या सलमान त्याचा आगामी चित्रपट 'रेस 3'च्या शूटिंगमध्ये आबुधाबीमध्ये व्यस्त आहे. मीडिया रिपोर्टनुसार चित्रपटाची शूटिंग आता शेवटच्या टप्प्यामध्ये आहे. त्यानंतर सलमान भारत आणि दबंग 3 च्या शूटिंगला सुरुवात करणार आहे. आबुधाबीमधून परतल्यानंतर  प्रभूदेवा 'दबंग 3'च्या स्क्रिप्टला घेऊन सलमानसोबस मिटिंग करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार 'दबंग 3'साठी अरबाज खान स्क्रिप्टिंग करतो आहे. आपल्या इंटरव्हु दरम्यान अरबाज खानने सांगितले होती की एप्रिल महिन्याच्या शेवटपर्यंत 'दबंग 3'चे स्क्रिप्ट तयार होणार आहे. ज्यानंतर पुढचा प्लॉन करण्यात येणार आहे. सलमान खान याच महिन्यांपासून चित्रपटाची शूटिंग सुरु करणार असल्याची चर्चा आहे.  

ALSO READ : कॅटरिनाच्या बहिणीसाठी ‘इतना तो बनता है’! ‘ओ ओ जाने जाना...’ घेऊन पुन्हा येतोय सलमान खान...!! 

दबंग सिरिजचे सगळे चित्रपट अजूनपर्यंत हिट गेले आहेत. याआधीच्या दोन्ही सिरीजमध्ये सलमानच्या अपोझिट सोनाक्षी सिन्हा दिसली होती मात्र अजूनपर्यंत 'दबंग3'च्या अभिनेत्रीचे नाव फायनल करण्यात आले नाही. 'दबंग 3'मध्ये चुलबुल पांडेच्या भुतकाळाची गोष्ट दाखवण्यात येणार आहे. 

Web Title: Salman Khan dares to release 'Dabangg3' release date with Ranveer Singh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.