सलमानला ‘आजोबा’ म्हटले, सलीम खान भडकले!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2016 19:53 IST2016-07-11T14:23:31+5:302016-07-11T19:53:31+5:30

सलमान खानचा ‘सुलतान’ लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतलायं. त्यामुळेच पहिल्या चार दिवसांत ‘सुलतान’ने २०० कोटींचा गल्ला जमवलास. एकीकडे ‘सुलतान’ वेगवेगळे ...

Salman Khan called 'grandfather', Salim Khan provoked! | सलमानला ‘आजोबा’ म्हटले, सलीम खान भडकले!

सलमानला ‘आजोबा’ म्हटले, सलीम खान भडकले!

मान खानचा ‘सुलतान’ लोकांनी चांगलाच डोक्यावर घेतलायं. त्यामुळेच पहिल्या चार दिवसांत ‘सुलतान’ने २०० कोटींचा गल्ला जमवलास. एकीकडे ‘सुलतान’ वेगवेगळे रेकॉर्ड कायम करत असताना दुसरीकडे एका टीव्ही शोमध्ये सलमानला आजोबाच्या वयाचा म्हणून हिणवण्यात आले. यावर सलमान काही बोलला नाही. सलमानचे वडील सलीम खान मात्र यावर जाम भडकले. आपल्या मुलाला कुणी आजोबाच्या वयाचे म्हणून हिणवावे, हे सलीम खान यांना अजिबात रूचलेले नाही. टिष्ट्वटरवरून त्यांनी याबद्दलची आपली नाराजी बोलून दाखवली.  सलमानच्या वयावर शेरेबाजी करणाºयांना त्यांनी ‘सुलतान’ पाहण्याचा सल्ला दिला. सलमान म्हातारा झाला, असे शोमध्ये वारंवार म्हटले गेले. सलमानच्या वयाबद्दल बोलणाºयांनी एकदा तरी ‘सुलतान’ बघावा, असे सलीम खान यांनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे. अब्बास जाफर दिग्दर्शित ‘सुलतान’ने पहिल्या चार दिवसांतच २०० कोटी कमवत एक रेकॉर्ड कायम केला आहे. भारतात ‘सुलतान’ १४८ कोटींचा गल्ला जमवला तर विदेशात सुमारे ५७ कोटी कमवले.

{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}


{{{{twitter_post_id####}}}}

Web Title: Salman Khan called 'grandfather', Salim Khan provoked!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.