​सलमान खानशिवाय बनणार ‘या’ सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2017 11:16 IST2017-12-25T05:46:11+5:302017-12-25T11:16:11+5:30

सलमान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांचा सुपरडुपर हिट ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटाचा ...

Salman Khan to become 'SuperDuper hit' sequel! | ​सलमान खानशिवाय बनणार ‘या’ सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल!

​सलमान खानशिवाय बनणार ‘या’ सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल!

मान खान, फरदीन खान आणि अनिल कपूर यांचा सुपरडुपर हिट ‘नो एन्ट्री’ हा चित्रपट आपल्याला आठवत असेलच. या चित्रपटाचा सीक्वल बनणार, हेही निश्चित आहे. पण या सीक्वलबद्दलच धक्कादायक बातमी आहे. होय, ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ असे नाव असलेला हा सीक्वल सलमान खानशिवाय बनवला जात आहे. होय, ‘नो एन्ट्री’चे दिग्दर्शक अनीस बज्मी यांनी हा निर्णय घेतला आहे. अनीस बज्मी यांनी तसे स्पष्ट केले आहे. सलमान खान ‘नो एन्ट्री’च्या सीक्वलमध्ये काम करण्यास राजी होत असेल तर ते चांगलेच होईल. त्याला या सीक्वलमध्ये रस नसेल तर त्याच्याऐवजी दुसºया अभिनेत्याची निवड केली जाईल, असे बज्मी यांनी स्पष्ट केले आहे. अर्थात बज्मी यांनी अद्याप यासंदर्भात कुठलीही अधिकृत घोषणा केलेली नाही. ‘मुबारका’ चित्रत्रपटाच्यावेळी बज्मी यांनी ‘नो एन्ट्री में एन्ट्री’चे संकेत दिले होते. या चित्रपटाची स्क्रिप्ट तयार आहे. आम्हाला केवळ सलमानच्या तारखांची प्रतीक्षा आहे, असे बज्मी म्हणाले होते. पण कदाचित सलमानच्या तारखांचा मेळ जमत नाहीय, असेच आताश: वाटू लागले आहे.



२००५ मध्ये आलेल्या ‘नो एन्ट्री’मध्ये सलमान एका महत्त्वपूर्ण भूमिकेत दिसला होता. त्याची भूमिका फार मोठी नव्हती. पण प्रेक्षकांना त्याची भूमिका प्रचंड आवडली होती. या चित्रपटासाठी सलमानने केवळ १६ दिवस शूट केले होते. आता ‘नो एन्ट्री में एन्ट्री’मध्ये त्याची भूमिका किती मोठी आहे, हे तर आम्हाला ठाऊक नाही. पण कदाचित सलमान राजी नसेल तर त्याच्याशिवायच ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ पाहण्याची मानसिक तयारी प्रेक्षकांना करावी लागले. खरे तर सलमानची जागा दुसरा कुणीच अभिनेता घेऊ शकत नाही. बज्मी सुद्धा याच्याशी सहमत आहेत. पण चित्रपट बनवायचा आहे म्हटल्यावर आणि सलमानकडे डेट्स नाही म्हटल्यावर दुसºया कुणाला घेण्यावाचून तसा दुसरा पर्यायही नाही. या समस्येतून बज्मी येत्या दिवसांत कसा तोडगा काढतात ते बघूच. शिवाय सलमानशिवाय ‘नो एन्ट्री में एन्ट्री’ आलाच तर तो प्रेक्षकांना किती भावतो, तेही पाहू.

ALSO READ : शिल्पा शेट्टीने मागितली माफी; पण सलमान खानचे काय?
 

Web Title: Salman Khan to become 'SuperDuper hit' sequel!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.