कॅटरिना कैफला सोडून यूलिया वंतूरसोबत पार्टीत पोहोचला सलमान खान

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2017 15:12 IST2017-12-26T09:39:16+5:302017-12-26T15:12:11+5:30

सलमान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रिलीजच्या आधीच या ...

Salman Khan arrives in the party along with Yuliya Vantoor, leaving Katrina Kaifa | कॅटरिना कैफला सोडून यूलिया वंतूरसोबत पार्टीत पोहोचला सलमान खान

कॅटरिना कैफला सोडून यूलिया वंतूरसोबत पार्टीत पोहोचला सलमान खान

मान खान आणि कॅटरिना कैफच्या जोडीचा टायगर जिंदा है चित्रपट नुकताच बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला आहे. रिलीजच्या आधीच या चित्रपटाने नवे रेकॉर्ड बनवले होते. रिलीज झाल्यानंतर चौथा दिवसापर्यंत या चित्रपटाने 154 कोटींची कमाई केली होती. चित्रपटाच्या सक्सेसच्या आनंदात सलमान आपली बहिण अर्पिता खानच्या घरी ख्रिसमस पार्टीसाठी पोहोचला. 

या पार्टीच्या ठिकाणी सलमान खान कथित गर्लफ्रेंड यूलिया वंतूरसोबत पोहोचला होता. ख्रिमसम पार्टीच्या ठिकाणी सलमान कॅज्युअल लूकमध्ये दिसला तर यूलिया रेड कलरच्या आउटफिटमध्ये दिसली.  टायगर जिंदा है मधील सलमानची कॉ-स्टार आणि एक्स गर्लफ्रेंड कॅटरिना कैफ मात्र एकटीच आली होती. 

गेल्या अनेक दिवसांपासून सलमान आणि यूलियाचे ब्रेकअप झाल्याची चर्चा होती. व्हिझा संपल्यावर यूलिया काहीकाळ तिच्या मायदेशी सुद्धा परतली होती. सलमान खानच्या प्रत्येकी फॅमिली फक्शनला यूलिया आवर्जुन हजर असते. दिवाळीत पहिल्यांदाच यूलिया पार्टीत दिसली नव्हती यावरुन अनेक उलटसुलट चर्चा करण्यात आल्या. टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान सलमान आणि कॅटरिना पुन्हा एकदा एकमेंकाच्या जवळ आल्याची चर्चा होती. याच कारणामुळे युलियाने टायगर जिंदा हैच्या शूटिंग दरम्यान आबु धाबीला येण्यासाठी हट्ट केला होता. मात्र सलमान तसे होऊन दिले नाही. कॅटरिना सलमानच्या आयुष्यात परतल्यामुळे सलमान आणि युलिया वंतूर यांच्यात दुरावा आल्याची ही चर्चा होती. शूटिंग दरम्यानचे सेटवरचे मस्ती करतानाचे फोटो कॅटरिना सोशल मीडियावर शेअर करत असायची. अर्पिता खानने सुद्धा सलमान आणि कॅटचा फोटो शेअर केला होता. शूटिंग सुरु असताना यूलियाने ही अब्बू धाब्बीमध्ये येण्याचा आग्रह सलमानकडे केला होता. मात्र सलमानने तसे होऊ दिले नाही.    

कॅटरिना आणि सलमानचे ब्रेकअप झाल्यानंतर तब्बल 5 वर्षांनी ते टायगर जिंदा है चित्रपटात एकत्र दिसले. हा चित्रपट एक था टायगरचा सीक्वल आहे. दोघांची ऑन स्क्रिन केमिस्टी ही प्रेक्षकांना आवडली आहे. रिलीजनंतर पाचव्या दिवशी ही चित्रपट हाऊसफुल्ल जातो आहे. 

ALSO READ :  ​सलमान खानशिवाय बनणार ‘या’ सुपरडुपर हिट चित्रपटाचा सीक्वल!

Web Title: Salman Khan arrives in the party along with Yuliya Vantoor, leaving Katrina Kaifa

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.