२२ तासांचा प्रवास करून अहिलच्या वाढदिवसाला पोहोचला सलमान खान!
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 30, 2017 14:14 IST2017-03-30T08:44:38+5:302017-03-30T14:14:38+5:30
अहिल शर्मा हा चिमुकला कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आणि असणार का नाही? शेवटी भाचा कुणाचा तर सलमान खानचा. होय, ...

२२ तासांचा प्रवास करून अहिलच्या वाढदिवसाला पोहोचला सलमान खान!
अ िल शर्मा हा चिमुकला कुण्या सेलिब्रिटीपेक्षा कमी नाही आणि असणार का नाही? शेवटी भाचा कुणाचा तर सलमान खानचा. होय, अहिलची आठवण होण्याचे कारण म्हणजे, आज (३० मार्च) तो एक वर्षाचा झाला. मग काय,सेलिब्रेशन तो बनता है. त्याच्या वाढदिवासाच्या सेलिब्रेशनचा खास बेत आखण्यात आलाय. अहिलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अख्खे खान व शर्मा कुटुंब मालदिवला पोहोचले आहे.
![]()
विशेष म्हणजे, मामू सलमान खान चक्क २२ तासांचा प्रवास करुन मालदिवला पोहोचला आहे. अहिलची आई व सलमानची बहीण अर्पिताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून या सेलिब्रेशनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहेत.
![]()
या सेलिब्रेशन पार्टीमध्ये सलमान खानची कथित प्रेयसी यूलिया वंतुर हीदेखील सहभागी होत आहे. सलमान खान सध्या ‘टायगर जिंदा है’च्या चित्रीकरणात व्यस्त आहे. पण भाच्यासाठी तब्बल २२ तासांचा प्रवास करून तो मालदिवला पोहोचला. अर्थात काल रात्री बाराच्या ठोक्याला झालेल्या केक कटिंगला सलमान हजर नव्हता.
पण आज सकाळी सलमान मालदीवला पोहोचला.
![]()
सलमान अर्पितावर जीवापाड प्रेम करतो. अहिलच्या जन्माचे गिफ्ट म्हणून सलमानने तिला बीएमडब्ल्यू भेट दिली होती. सलमान अनेकदा अहिलसोबत मस्तीममूडमध्ये दिसला आहे. वेळ मिळेल तेव्हा तो अहिलसोबत वेळ घालवतो.आता तर वेळात वेळ काढून तो अहिलसोबत धम्माल मस्ती करणार आहे.
![]()
![]()
ALSO READ : बाळ अहिल अन् मामू सलमानचा फोटो व्हायरल!
अहिलच्या वाढदिवसाच्या सेलिब्रेशनसाठी अर्पिता खान शर्मा, तिचा नवरा आयुष शर्मा, अरबाज खान, सोहेल खान, सलमान खानचे वडील सलीम आणि आई सलमा खान व हेलन हे मालदिवला पोहोचले. रात्री १२ वाजता अहिलने मम्मी अर्पितासोबत केक कापला. यावेळी त्याचे पापा फोटो काढताना दिसले.