मायलेकाचं नातं! सलमान खान आणि त्याच्या आईचा भावुक करणारा व्हिडिओ

By ऑनलाइन लोकमत | Published: February 24, 2024 11:40 AM2024-02-24T11:40:39+5:302024-02-24T11:41:00+5:30

सलमान आणि त्याची आई सलमा खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

salman khan and mother salma khan emotional video seeking attention on internet | मायलेकाचं नातं! सलमान खान आणि त्याच्या आईचा भावुक करणारा व्हिडिओ

मायलेकाचं नातं! सलमान खान आणि त्याच्या आईचा भावुक करणारा व्हिडिओ

बॉलिवूडचा भाईजान अशी ओळख असलेला सलमान खान कायमच चर्चेत असतो. एक सो एक सुपरहिट सिनेमे बॉलिवूडला दिलेला सलमान प्रेक्षकांच्या मनात राज्य करतो. त्याचा चाहता वर्गही प्रचंड मोठा आहे. भाईजान त्याच्या दिसखुलास आणि डॅशिंग स्वभावासाठीही ओळखला जातो. अनेकदा बिग बॉसमध्येही सलमान स्पर्धकांची शाळा घेताना दिसतो. प्रेक्षक आणि चाहत्यांसाठी भाई असलेला सलमान त्याच्या आईसमोर मात्र अजूनही लहान बाळच आहे. 

सलमान आणि त्याची आई सलमा खान यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सेलिब्रिटी क्रिकेट लीग(CCL)साठी सलमान त्याच्या कुटुंबीयांसह दुबईला गेला आहे. यावेळेचा स्टेडियममधील सलमान आणि सलमा खान यांच्या व्हिडिओने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. या व्हिडिओत स्टेडियममध्ये बसलेल्या सलमा यांच्याकडे जाताच त्या सलमान खानवर लहान मुलाप्रमाणेच प्रेम करताना दिसत आहेत. मायलेकाचं नातं सांगणारा हा भावुक करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे. विरल भय्यानी या इन्स्टाग्राम पेजवरुन शेअर करण्यात आला आहे. 

या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी कमेंटही केल्या आहे. एकाने लिहिलं आहे की "यशस्वी होण्याचं हेच एक कारण आहे". तर दुसऱ्या युजरने "तो एक चांगला मुलगा आहे", असं लिहिलं आहे. "त्याच्याबरोबर आईवडिलांचा आशीर्वाद आहे. हा खरंच चांगला लेक आहे," अशी कमेंटही केली आहे. 

Web Title: salman khan and mother salma khan emotional video seeking attention on internet

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.