बोट खरेदीसाठी सलमानला मिळताहेत टीप्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 10, 2016 06:02 IST2016-01-16T01:10:36+5:302016-02-10T06:02:06+5:30

 त्याला वाढदिवसाला महागडे गिफ्ट मिळणार असून, २७ डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे. त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांच्या शुभेच्छाबरोबरच महागडी बोट ...

Salman getting tips for buying a boat | बोट खरेदीसाठी सलमानला मिळताहेत टीप्स

बोट खरेदीसाठी सलमानला मिळताहेत टीप्स

 
्याला वाढदिवसाला महागडे गिफ्ट मिळणार असून, २७ डिसेंबरला त्याचा वाढदिवस आहे. त्याचे कुटुंबीय आणि मित्र यांच्या शुभेच्छाबरोबरच महागडी बोट भेट मिळणार आहे. सलमानच्या वाढदिवसाला खरेदी करण्यात येणारी नवी बोट कशी असावी, यासाठी सलमानला काही तज्ज्ञांनी टीप्स दिल्या आहेत. सलमानची बहिण अर्पिताने म्हटले आहे की, सलमान केवळ फॅमिली मेंबर नाही, तर एक चांगला होस्टही आहे. मरीन सोलुशन्सच्या व्यवस्थापकीय संचालक अंजु दत्ता यांनी सलमानला स्पोर्टस् बोट खरेदी करण्याचा सल्ला दिला आहे. अशाप्रकारची बोट सलमानला परफेक्ट होईल, असेही त्यांनी म्हटले आहे. मनोरंजनाचा अभिनेता असलेला सलमान विविध प्रकारच्या चित्रपटांमधून त्याच्या कलेचा आविष्कार करतो. त्याच्यासाठी स्पोर्ट बोट परफेक्ट आहे.
साहसी खेळांचा चाहता : फिटनेस हा सलमानच्या आयुष्याचा एक भाग बनला आहे. तसेच तो पाण्यातील साहसी खेळाचाही चाहता आहे. पश्‍चिम मरीनचे अश्‍विन मोंगिया यांनी म्हटले आहे की, सलमानच्या फिटनेसप्रमाणे बोटदेखील १00 फिटनेस पार्ट असलेली असावी. तसेच बोटीवर हेलिपॅडची व्यवस्था असल्यास आणखी सुंदर होईल.
मुडी माणूस : सलमान आणि मूड जणू हातात हात घालून जातात, असे सलमानबाबत म्हणता येईल. कॉर्पोरेट वकील आणि अक्वॉसेलचे संस्थापक शकील कुड्रोली यांनी सलमानच्या बोट खरेदी करण्यातही त्याचा मूड रिफ्लेक्ट होत असल्याचे म्हटले आहे. सलमानने लक्झरिअस बोट खरेदी करावी असा सल्ला त्यांनी दिला आहे.
सलमानच्या अटींनुसार काही बोटींच्या किमती
१) आक्टोपस : 1 हजार 337 कोटी इतकी या बोटीची किंमत असून, ही बोट मायक्रोसॉप्टचे सहसंस्थापक पॉल अलेन यांच्याकडे आहे. या बोटीत पूल, दोन हेलिपॅड, एक थिएटर, बास्केटबॉल कोर्ट, रेकॉर्डिंग स्टुडिओ यासह अनेक सुविधा आहेत.
२) इंडियन एम्प्रेस : विजय मल्ल्या यांनी ६६४ कोटीमध्ये ही बोट खरेदी केली आहे. ३११ फूट बोटीमध्ये दोन लक्झरी कार पार्क करता येतात. त्याचप्रमाणे अनेक लक्झरी बेडरुम आहेत.
३) रोझहर्टी : रुपर्ड र्मडाक यांनी १९८ कोटीमध्ये बोट घेतली होती. वायरलेस इंटरनेट आणि प्लाजमा टेलिव्हीजन्स प्रत्येक केबीनमध्ये आहेत.
cnxoldfiles/strong> : मन्सूर बिन झायेद अल नहॅन यांच्याकडे ही बोट होती. साधारण २,९२२ कोटी किंमत असलेल्या बोटीत आठ मजले आहेत.

Web Title: Salman getting tips for buying a boat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.