‘धूम ४’ मध्ये सलमान?

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 13:20 IST2016-06-12T07:50:43+5:302016-06-12T13:20:43+5:30

सलमान खान ‘धूम’ चित्रपटाच्या आगामी सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘धूम ४’मध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या आहेत. यशराज ...

Salman in 'Dhoom 4'? | ‘धूम ४’ मध्ये सलमान?

‘धूम ४’ मध्ये सलमान?

मान खान ‘धूम’ चित्रपटाच्या आगामी सिक्वेलमध्ये म्हणजेच ‘धूम ४’मध्ये काम करणार असल्याच्या चर्चा सध्या बॉलिवूडमध्ये रंगू लागल्या आहेत. यशराज बॅनर्सखालील ‘एक था टायगर’ आणि ‘सुलतान’ या दोन चित्रपटात काम केल्यानंतर सलमान पून्हा याच बॅनर्सखाली काम करणार असल्याचे समजते. पुढल्यावर्षी या सिनेमाची शूटिंगही सुरु होण्याची शक्यता आहे.

‘सुलतान’ च्या पोस्ट प्रॉडक्शनचं काम सुरु असतानाच, आदित्य चोप्राने सलमान खानला धूमच्या सिक्वेलबाबत विचारलं होतं. २०१७ च्या मध्यानंतर उत्तर अमेरिकेत धूमच्या चौथ्या सिक्वेलची शूटिंग सुरु होणार आहे.
धूमच्या चौथ्या सिक्वेलमध्ये सलमान खान काम करणार असल्याचे यशराज फिल्म्सने अद्याप अधिकृतपणे उघड केलेले नाही.

Web Title: Salman in 'Dhoom 4'?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.