मोठा झाला सलमान-आमिरचा आॅनस्क्रिन मुलगा; नव्या अवतारात मोठमोठ्या स्टार्सला देतोय टक्कर!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 1, 2018 14:37 IST2018-04-01T09:06:55+5:302018-04-01T14:37:37+5:30

सलमान आणि आमिरच्या मुलाची भूमिका साकारणारा हा बालकलाकार आता मोठा झाला आहे. लवकरच त्याची इंडस्ट्रीत ग्रॅण्ड एंट्री होण्याची शक्यता आहे.

Salman-Aamir's son Ancrine; Brought to the big stars in the new avatar! | मोठा झाला सलमान-आमिरचा आॅनस्क्रिन मुलगा; नव्या अवतारात मोठमोठ्या स्टार्सला देतोय टक्कर!

मोठा झाला सलमान-आमिरचा आॅनस्क्रिन मुलगा; नव्या अवतारात मोठमोठ्या स्टार्सला देतोय टक्कर!

लिवूडमध्ये सुरुवातीपासूनच बालकलाकारांची महत्त्वाची भूमिका राहिली आहे. काही बालकलाकारांनी तर अजरामर भूमिका साकारल्या आहेत. विशेष म्हणजे आजही इंडस्ट्रीतील बड्या कलाकारांचा चेहरा त्या बालकलाकारांमध्ये बघितला जातो. सद्य:स्थितीचा विचार केल्यास बरेचसे बालकलाकार छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाचा करिश्मा दाखवित आहेत. अशाच एका बालकलाकाराबद्दल आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. मोठ्या पडद्यावर आमिर खान, सलमान खानसारख्या सुपरस्टारच्या मुलाची भूमिका साकारणारा हा कलाकार आता मोठा झाला आहे. सध्या तो आपल्या लूकनी मोठमोठ्या स्टार्सला टक्कर देताना दिसत आहे. 



दिग्दर्शक डेविड धवनच्या ‘पार्टनर’ या सुपरहिट चित्रपटात सलमान खानच्या सावत्र मुलाची भूमिका साकारणाºया अली हाजी या अभिनेत्याने ‘ता रा रम पम’ या चित्रपटामध्ये एक मोठी भूमिका साकारली. दरम्यान, या अभिनेत्याच्या क्यूटनेसमुळे त्याची बालकलाकाराची भूमिका प्रेक्षकांना जबरदस्त भावायची. आता त्याने मोठ्या पडद्यावर एंट्री केली असून, त्याचा लूक बड्या बड्या सुपरस्टार्सला धडकी भरविणारा ठरत आहे. दरम्यान, बालकलाकाराची भूमिका साकारताना या अभिनेत्याने आमिर खानच्या सुपरहिट ‘फना’ या चित्रपटात त्याच्या मुलाची भूमिका साकारली होती. त्यावेळी त्याचे वय केवळ ६ वर्षे इतके होते. दरम्यान, या अभिनेत्याने आतापर्यंत शंभरपेक्षा अधिक जाहिरातींमध्ये काम केले आहे. 








आता अली हाजी मोठा झाला असून, तो खूपच हॅण्डसम दिसत आहे. अलीचा जन्म मुंबईमध्ये झाला असून, त्याने २००६ मध्ये फिल्मी दुनियेत पाऊल ठेवले होते. त्याने आतापर्यंत ‘फना, पार्टनर, ता रा रम पम, द्रोणा, लाइफ पार्टनर, पाठशाला आणि रायट या रॉन्ग’ या चित्रपटांमध्ये महत्त्वाच्या भूमिका साकारल्या. २००९ मध्ये आलेल्या ‘माय फ्रेंड गणेशा-२’मधील त्याची भूमिका विशेष गाजली. सध्या अली ‘द फिल्ड’ या हॉलिवूडपटाच्या शूटिंगमध्ये अभिनेता रोनित रॉयबरोबर व्यस्त आहे. अलीचा स्वत:चे ‘क्लीन स्टेट स्टुडिओ’ नावाचे प्रॉडक्शन हाउस आहे. ज्याच्या माध्यमातून त्याने काही मालिकांचे दिग्दर्शनही केले आहे. ज्यामध्ये ‘काया आणि द मॅड वर्ल्ड आॅफ रूस्तम ईरानी’ यासारख्या मालिकांचा समावेश आहे. 

Web Title: Salman-Aamir's son Ancrine; Brought to the big stars in the new avatar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.