‘सैराट’ने इरफानलाही लावले ‘याड’; मित्रांसाठी ‘स्पेशल स्क्रिनिंग’
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 23, 2016 20:51 IST2016-05-23T14:08:12+5:302016-05-23T20:51:21+5:30
सर्वांना ‘याड’ लावणाºया ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने आता बॉलिवूड अभिनेता इरफान खान यालाही ‘याड’ लावले. ‘सैराट’मधील आर्ची अन् परशाच्या ...

‘सैराट’ने इरफानलाही लावले ‘याड’; मित्रांसाठी ‘स्पेशल स्क्रिनिंग’
स ्वांना ‘याड’ लावणाºया ‘सैराट’ या मराठी चित्रपटाने आता बॉलिवूड अभिनेता इरफान खान यालाही ‘याड’ लावले. ‘सैराट’मधील आर्ची अन् परशाच्या पे्रमकहानीने इरफान नुसता भारावून गेला. ही कथा अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचावी, यासाठी त्याने ‘सैराट’चे स्पेशल स्क्रिनिंगही ठेवले. या स्क्रिनिंगला इरफानच्या बॉलिवूडमधील मित्रपरिवारासह इरफानचे कुटुंबही हजर होते. ‘सैराट’मधील आर्ची अन् परशा म्हणजे मराठी रोमिओ-ज्युलिएट आहेत. मराठीसह प्रादेशिक चित्रपटसृष्टीचे हे नवे पर्व आहे आणि जागतिक पातळीवर सिनेमा घेऊन जाण्याची ताकद प्रादेशिक चित्रपटसृष्टीत आहे, असे इरफान म्हणाला.
![]()

मला मराठीत काम करायचेयं...
होय, इरफान खान मराठी चित्रपटांमध्ये काम करण्यास उत्सूक आहे. सीएनएक्स डिजिटल डॉट कॉमशी बोलताना इरफानने मनीची ही इच्छा बोलून दाखवली. मराठीत अनेक दर्जेदार चित्रपट येत आहेत. ‘सैराट’ने मला भारावून सोडले. त्याआधी ‘फ्रन्ड्री’ आणि ‘किल्ला’ हे चित्रपटही मला खूप आवडले होते. संधी आलीच तर मराठी सिनेमात काम करायला मला आवडेल. किंबहूना मी त्याची प्रतीक्षा करतोय, असे इरफान यावेळी म्हणाला.