​ सैफ अली खान लावणार चित्रपटांचा धडका!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 12, 2017 14:00 IST2017-05-12T08:30:42+5:302017-05-12T14:00:42+5:30

सैफ अली खानचा अलीकडे आलेला ‘रंगून’ फार काही खास कमाल करू शकला नाही. पण आगामी सिनेमांकडून सैफला बरीच अपेक्षा ...

Saif Ali Khan will be the director of films! | ​ सैफ अली खान लावणार चित्रपटांचा धडका!

​ सैफ अली खान लावणार चित्रपटांचा धडका!

फ अली खानचा अलीकडे आलेला ‘रंगून’ फार काही खास कमाल करू शकला नाही. पण आगामी सिनेमांकडून सैफला बरीच अपेक्षा आहे आणि का नसावी, एक नाही, दोन नाही तर चार सिनेमे सैफ करतोय. यावर्षी सैफचे हे चार सिनेमे रिलीज होतील आणि या प्रत्येक चित्रपटात सैफ एका वेगळ्या रूपात बघायला मिळणार आहे. गतकाळातील एकापाठोपाठ आलेले सगळेच सिनेमे फ्लॉप ठरल्यानंतर सैफच्या करिअरने अचानक कलाटणी घेतलेली दिसतेय.
‘शेफ’,‘कलाकंदी’,‘बाजार’ अशा तीन सिनेमांवर सैफने काम सुरु केले आहे. आणखी काही चित्रपटही त्याने फायनल केले आहेत. यावरही लवकरच काम सुरु होणार आहे. विपुल शहा यांच्या आगामी चित्रपटात सैफ एका डॉक्टरच्या भूमिकेत दिसणार असल्याचे कळतेय.  खरे तर विपुल शहा यांनी २००९ मध्ये या सिनेमाची स्क्रिप्ट सैफला ऐकवली होती. तेव्हापासून सैफ या प्रोजेक्टमध्ये इंटरेस्टेड होता. ड्रग्ज टेस्टिंगबद्दल भारतीयांचा वाढता इंटरेस्ट यावर या चित्रपटाची कथा आधारलेली आहे. या चित्रपटावर बरेच संशोधन करण्यात आले आहे आणि फायनली, चित्रपटाची स्क्रिप्ट बनून तयार आहे.‘शेफ’मध्ये सैफ शेफच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट २०१४ मध्ये आलेला अमेरिकन चित्रपट ‘शेफ’चा हिंदी रिमेक आहे.
‘बाजार’ या चित्रपटात सैफ स्टॉकब्रोकरची भूमिका साकारणार आहे. ‘कलाकंदी’ या चित्रपटात यात तीन कथा असतील. यातील एका कथेत सैफ अली खान आपल्याला दिसेल. ‘रात बाकी’ या चित्रपटात सैफ हा कॅटरिनासोबत दिसणार आहे. या चित्रपटानंतर सैफचे नशीब कसे कलाटणी घेते, ते आपण बघूच.

Web Title: Saif Ali Khan will be the director of films!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.