महेश मांजरेकरांची लेक करतीये 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट? सईने केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2022 03:56 PM2022-01-30T15:56:41+5:302022-01-30T15:58:52+5:30

Saiee Manjrekar: सध्या सई तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. सई एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे.

saiee manjrekar debunks rumors with her linkup with subhan nadiadwala says weird | महेश मांजरेकरांची लेक करतीये 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट? सईने केला खुलासा

महेश मांजरेकरांची लेक करतीये 'या' प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट? सईने केला खुलासा

googlenewsNext

चित्रपट दिग्दर्शक महेश मांजरेकर (Mahesh Manjrekar)  यांची लेक सई मांजरेकर (Saiee Manjrekar) सोशल मीडियावर कायमच चर्चेत असते. अलिकडेच तिने 'दबंग ३' या चित्रपटाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं आहे. त्यामुळे ती चाहत्यांमध्ये कायम चर्चेत असते. यामध्येच सध्या सई तिच्या प्रोफेशनल लाइफपेक्षा पर्सनल लाइफमुळे चर्चेत आली आहे. सई एका प्रसिद्ध निर्मात्याच्या मुलाला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. मात्र, या चर्चांवर सईने मौन सोडलं असून तिची बाजू स्पष्ट केली आहे.

अलिकडेच सईने एक मुलाखत दिली. या मुलाखतीत तिने अफेअरच्या चर्चांवर भाष्य केलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सई, प्रसिद्ध निर्माते साजिद नाडियादवाला यांच्या मुलाला सुभान नाडियादवाला याला डेट करत असल्याचं म्हटलं जात आहे. परंतु, या सगळ्या अफवा असल्याचं सईने स्पष्ट केलं आहे.

"लहानपणापासून आम्ही दोघंही चांगले मित्र आहोत. त्यामुळे एकमेकांना खूप चांगल्या पद्धतीने ओळखतो.पण, आम्ही एकमेकांना डेट करत नाहीये. सध्या ज्या काही चर्चा सुरु आहेत त्यामध्ये काहीही तथ्य नाही", असं म्हणत सईने अफेअरच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत.

पुढे ती म्हणते, "मला या सगळ्या गोष्टी खूप विचित्र वाटतायेत. आम्ही दोघंही एकाच शाळेत शिकलोय त्यामुळे लहानपणापासून आमची ओळख आहे. यापूर्वी अशा अफवा कधीच पसरल्या नाहीत.पण, मला, माझ्या मित्रपरिवाराला आणि कुटुंबाला नेमकं सत्य काय आहे हे चांगलंच माहितीये."

दरम्यान, काही दिवसांपूर्वी सई आणि सुभान यांना एकत्र स्पॉट करण्यात आलं होतं. यावेळी एकत्र फोटो काढण्यास त्यांनी नकार दिला होता. तेव्हापासून या दोघांच्या अफेअरची चर्चा रंगली आहे.
 

Web Title: saiee manjrekar debunks rumors with her linkup with subhan nadiadwala says weird

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.