नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी

By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2024 04:52 PM2024-06-13T16:52:06+5:302024-06-13T16:54:16+5:30

Matka King : राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे मटका किंगचे दिग्दर्शन करणार आहेत. यात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Saie Tamhankar's character in Nagraj Manjule's 'Matka King' | नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी

नागराज मंजुळे यांच्या 'मटका किंग'मध्ये सई ताम्हणकरची वर्णी

अभिनेत्री सई ताम्हणकर (Saie Tamhankar) मराठी कलाविश्वातील प्रसिद्ध अभिनेत्री आहे. सईने आतापर्यंत विविध भूमिका साकारून रसिकांच्या मनात घर केले आहे. २०२४ वर्ष तिच्यासाठी खास आहे. काही दिवसापूर्वी एक्सेल एंटरटेन्मेंट सोबत दोन नव्या प्रोजेक्ट्सची घोषणा करत सईने तिच्या बॉलिवूड प्रोजेक्टबद्दल माहिती दिली होती आणि नुकतेच अॅमेझॉन प्राईमने मटका किंगची अधिकृत घोषणा करून सई देखील या खास प्रोजेक्टचा भाग असल्याचे सांगितले आहे. 

राष्ट्रीय पुरस्कार विजेते नागराज मंजुळे मटका किंगचे दिग्दर्शन करणार आहेत. यात विजय वर्मा मुख्य भूमिकेत असून सई ताम्हणकरदेखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे. सई म्हणाली की, "नागराज मंजुळे सोबत काम करण्याची इच्छा माझी होती आणि ही गोष्ट माझ्या विश लिस्टमध्ये देखील होती. आता आम्ही मटका किंगसारख्या प्रोजेक्टसाठी एकत्र काम करतोय आणि या निमित्ताने ही इच्छा पूर्ण होते याचा आनंद आहे. 

अनेक मुलाखती आणि सोशल मीडिया पोस्टमधून त्यांच्या सोबत काम करण्याची इच्छा व्यक्त देखील केली होती आणि स्वप्नपूर्ती होते म्हणून एक वेगळं सुख आहे हे. अॅमेझॉन प्राईमसाठी ही वेब सीरिज आम्ही करत आहोत आणि विजय वर्मा देखील त्याचा एक भाग आहे. विजय सोबत सुद्धा पहिल्यांदा काम करण्याचा अनुभव यामुळे मिळणार आहे. तो एक उत्तम कलाकार आणि त्यांचा सोबत हा प्रोजेक्ट करतेय म्हणून मी खूप उत्सुक आहे. आता एवढंच सांगू शकते मटका किंग हा एक वेगळा अनुभव असणार आहे. लवकरच याबद्दल अनेक गोष्टी तुम्हाला समजतील. नागराज मंजुळे, विजय वर्मा आणि मटका किंग साठी मला खूप उत्सुकता आहे हे वेगळं थ्रील असणार यात शंकाच नाही." 

ग्राउंड झिरो, अग्नी सारखे दोन उत्तम चित्रपट आणि आता मटका किंग वेब सीरिज या व्यतिरिक्त सई डब्बा कार्टेल वेबसीरिजमध्ये दिसणार आहे. नागराज मंजुळेच्या प्रोजेक्टमध्ये सई ताम्हणकरला काम करताना पाहणे कमालीचे ठरणार आहे. 

Web Title: Saie Tamhankar's character in Nagraj Manjule's 'Matka King'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.