पहिल्यांदा मुलांशिवाय व्हेकेशनवर जाणार ह्रतिक रोशन-सुझैन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2018 13:03 IST2018-03-19T07:33:53+5:302018-03-19T13:03:53+5:30

बॉलिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट सुपर 30 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी ह्रतिकने आपला लूक ...

Roshan-Suzanne will go on vacation without first child! | पहिल्यांदा मुलांशिवाय व्हेकेशनवर जाणार ह्रतिक रोशन-सुझैन!

पहिल्यांदा मुलांशिवाय व्हेकेशनवर जाणार ह्रतिक रोशन-सुझैन!

लिवूड अभिनेता ह्रतिक रोशन सध्या त्याचा आगामी चित्रपट सुपर 30 च्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे. या चित्रपटासाठी ह्रतिकने आपला लूक देखील बदलला आहे. यामध्येच अशी बातमी आली आहे की तो आपल्या पूर्व पत्नीसोबत व्हेकेशन जाणार आहे. घटस्फोट घेतल्यानंतर अनेक वेळा दोघांना मुलांसोबत व्हेकेशन एन्जॉय करताना दिसले आहेत. मात्र पहिल्यांदाच दोघे मुलांशिवाय व्हेकेशनवर जाणार आहेत. व्हेकेशनवर जाण्यामागचे कारण असे की दोघांना एकमेकांना वेळ द्यायचा आहे. काही रिपोर्टनुसार ह्रतिक आणि सुझैनसोबत पुन्हा एकदा विवाहबंधनात अडकणार आहे. दोघांना मुलांच्या संगोपनात काही कमी पडू द्यायचे नाही आहेत.  

2014 मध्ये ह्रतिक आणि सुझैन यांनी घटस्फोट घेतला. कहो ना प्यार है चित्रपट रिलीज झाल्यानंतर ऋतिकने आपले पहिले प्रेम सुझैनसोबत 2000 साली लग्न केले होते. मात्र दोघांमध्ये मतभेद झाल्यानंतर 14 वर्षांनी ते वेगळे झाले होते. 2014 मध्ये ऋतिक आणि सुझैनने घटस्फोट घेतला होता. ऋतिक आणि सुझैनला दोन मुलं सुद्धा आहेत मोठ्या मुलाचे नावं रेहान आणि छोट्या रिदान. घटस्फोट झाल्यानंतरही दोघं अनेक वेळा व्हेकेशनवर मुलांसोबत एकत्र दिसायचे. 

ALSO READ :  या पुढे लीक नाही होणार ह्रतिक रोशनचा 'सुपर ३०'मधला लूक, चित्रपटाच्या टीमने उचलले हे पाऊल

हृतिकबद्दल सांगायचे तर तो ‘सुपर30’ चित्रपटात बिझी आहे. काही दिवसांपूर्वी हृतिकचे पापड विकतानाचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते.  ‘सुपर30’ हा चित्रपट पाटणाच्या आनंद कुमार याच्या जीवनावर आधारित आहे. आनंद कुमार बिहारात ‘सुपर ३०’ नावाचा एक प्रोग्राम चालवतात. या प्रोग्रामअंतर्गत आनंद कुमार यांनी आत्तापर्यंत अनेक गरिब व होतकरू मुलांना नि:शुल्क शिकवून त्यांना आयआयटीमध्ये प्रवेश मिळवून दिला आहे. जे विद्यार्थी अतिशय हुशार आहेत परंतु आर्थिक अडचणींमुळे आयआयटीच्या परीक्षा देऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना आनंद कुमार संधी देतात. पुढच्या वर्षी 25 जानेवरीला हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 

Web Title: Roshan-Suzanne will go on vacation without first child!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.