​‘तुम बिन २’मधील रोमांस खरा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 6, 2016 19:12 IST2016-11-06T19:12:46+5:302016-11-06T19:12:46+5:30

आगामी ‘तुम बिन २’ या चित्रपटात दिसणारा रोमांस खरा असल्याचे अभिनेता आदित्य सिल याने सांगितले आहे. या चित्रपटाला आम्ही ...

The romance in 'You Bin 2' is true | ​‘तुम बिन २’मधील रोमांस खरा

​‘तुम बिन २’मधील रोमांस खरा

ong>आगामी ‘तुम बिन २’ या चित्रपटात दिसणारा रोमांस खरा असल्याचे अभिनेता आदित्य सिल याने सांगितले आहे. या चित्रपटाला आम्ही वेगळ्या पद्धतीने अनुभवले आहे. आमचा चित्रपट चांगला व स्वच्छ असल्याचेही तो म्हणाला. 

दिग्दर्शक अनुभव सिन्हाचा आगामी चित्रपट ‘तुम बिन २’ लवकर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी एका कार्यक्रमात पोहोचलेला अभिनेता आदित्य सिलने चित्रपटाविषयी सांगितले. तो म्हणाला, आम्ही ‘तुम बिन २’ मध्ये जो रोमांस सादर केला आहे, तो खरा आहे. आज खरे प्रेम संपू पाहत आहे, हे चांगले नाही. आज खरे प्रेम दूषित झाले असल्याचे मत त्याने व्यक्त केले. 

नजरेतून प्रेमाला अतिशय सुंदर पद्धतीने अभिव्यक्त करता येते. आपल्या मनातील भावनांना जोडण्याचे हे अतिशय प्रभावी माध्यम आहे. एकमेकांना जोडण्याच्या या माध्यमाला आम्ही चित्रपटातून दाखविण्याचा प्रयत्न करणार आहोत. नजरेतून मनापर्यंत पोहोचणारे प्रेमच खरे असू शकते असेही आदित्य म्हणाला.



अनेक चित्रपट निर्माते व दिग्दर्शक प्रेक्षकांना आकर्षित करण्यासाठी अंतरंग दृष्यांचा जास्तीत जास्त वापर करताना दिसतात. आदित्यला यात काहीच तथ्य वाटत नाही. आमच्या चित्रपटात तुम्हाला विनाकारण अशी दृष्ये दिसणार नाहीत. सिनेमा मार्के टिंग करताना अशा प्रकारची कोणतीही किनार असावी असेही आम्हाला वाटत नाही. चित्रपट जेवढा चांगला व स्वच्छ असेल तेवढाच तो प्रेक्षकांना पसंत पडतो असेही आदित्य म्हणाला. 

‘तुम बिन २’ हा चित्रपट २००१ साली प्रदर्शित झालेला रोमँटिक ड्रामा ‘तुम बिन’चा सिक्वल आहे. यात आदित्य सिल, नेहा शर्मा, आशिम गुलाटी यांच्या प्रमुख भूमिका आहेत. विशेष म्हणजे ‘तुम बिन’ चित्रपटात वापरलेली सर्व गाणी नव्या रुपात ‘तुम बिन २’मध्ये वापरण्यात आली आहे. युवकांत आजही ‘तुम बिन’ची क्रेझ कायम असल्याचे बोलले जाते. 

Web Title: The romance in 'You Bin 2' is true

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.