साहोत प्रभास करणार श्रद्धा कपूरसोबत रोमांस?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2017 06:16 AM2017-08-03T06:16:39+5:302017-08-03T12:48:40+5:30

बाहुबलीनंतर प्रभासचे फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. याचित्रपटातून आधीच अनुष्का शेट्टीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे ...

Romance with Shraddha Kapoor to prop up Sahoke? | साहोत प्रभास करणार श्रद्धा कपूरसोबत रोमांस?

साहोत प्रभास करणार श्रद्धा कपूरसोबत रोमांस?

googlenewsNext
हुबलीनंतर प्रभासचे फॅन्स त्याच्या आगामी चित्रपटाची आतुरतेने वाट बघतायेत. याचित्रपटातून आधीच अनुष्का शेट्टीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आलेला आहे. त्यामुळे या चित्रपटासाठी नव्या अभिनेत्रीचा शोध घेणे सुरु झाले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या भूमिकेसाठी अभिनेत्री श्रद्धा कपूर हिच्याशी सुरु आहे. जर श्रद्धाचे नाव फायनल झाले तर साहोमध्ये प्रभाससोबत रोमांस करताना श्रद्धा कपूर दिसू शकते. श्रद्धा कपूरने या चित्रपटात काम करण्यासाठी एक मोठी रक्कम मागितली आहे. तिने 7 कोटींचे मानधन साहोसाठी मागितले आहे.चित्रपटाचे निर्माते या गोष्टींवर विचार करत आहेत. साहोचा बजेट 150 कोटींचा आहे. जर श्रद्धाची डिमांड मेकर्सने पूर्ण केली तर लवकरच प्रभास आणि श्रद्धाची जोडी आपल्याला मोठ्या पडद्यावर दिसू शकते.  

याआधी अनुष्का शेट्टीशी या भूमिकेसंदर्भात बोलणे सुरु होते. अनुष्काला वाढलेले वजन कमी करण्यासाठी काही वेळदेखील देण्यात आला होता. मात्र त्या कालावधीत ती आपले वजन कमी नाही करु शकली त्यामुळे तिला या चित्रपटातून अखेर बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला. यानंतर यात पूजा हेगडेला साईन करण्यात आल्याची पण चर्चा झाली होती. चित्रपटाची शूटिंग युरोप, दुबई, आबू धाबी आणि मुंबईत होणार आहे. साहो तेलगू, तामिळ आणि हिंदीत भाषेत रिलीज केला जाणार आहे. या माहिन्यापासून चित्रपटाची शूटिंग सुरु करण्यात येणार आहे. या चित्रपटात नील नितिश मुकेश आणि चंकी पांडेसुद्धा दिसणार आहेत. 

Also read : SEE PIC : ‘बाहुबली’ प्रभासचे ‘हे’ नवे फोटो तुम्ही बघितले काय?

श्रद्धा कपूर सध्या तिचा आगामी चित्रपट 'हसीना पारकर'च्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. हा चित्रपटा अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची बहिण हसीना पारकरच्या आयुष्यावर आधारित आहे.यात श्रद्धा हसीना पारकरची भूमिका साकारते आहे. 

Web Title: Romance with Shraddha Kapoor to prop up Sahoke?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.