‘साहो’मध्ये प्रभाससोबत बॉलिवूडची ही ‘लव्हली गर्ल’ करणार रोमान्स; अनुष्का शेट्टीचा पत्ता कट!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2017 04:19 PM2017-08-01T16:19:21+5:302017-08-01T21:49:21+5:30

गेल्या आठवड्यातच या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव समोर आले होते, परंतु आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे नव्हे तर बॉलिवूडची लव्हली गर्ल श्रद्धा कपूर प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे.

Romance to make 'Bollywood Girl' with Prabhas in 'Saoho'; Anushka Shetty's address cut! | ‘साहो’मध्ये प्रभाससोबत बॉलिवूडची ही ‘लव्हली गर्ल’ करणार रोमान्स; अनुष्का शेट्टीचा पत्ता कट!

‘साहो’मध्ये प्रभाससोबत बॉलिवूडची ही ‘लव्हली गर्ल’ करणार रोमान्स; अनुष्का शेट्टीचा पत्ता कट!

googlenewsNext
ाहुबली-२’ रिलीज झाल्यानंतर प्रभासला मिळालेले वलय पाहता आगामी काळात तो एक सुपरस्टार म्हणून पुढे येईल यात दुमत नाही. सध्या त्याच्या आगामी ‘साहो’ या चित्रपटाची जोरदार चर्चा रंगली असून, तो या चित्रपटात कोणासोबत रोमान्स करणार यावरून घमासान सुरू आहे. सुरुवातीला सोनम कपूर नंतर कॅटरिना कैफ त्यानंतर अनुष्का शेट्टी यांची नावे आतापर्यंत समोर आली आहेत. ‘बाहुबली-२’मध्ये अनुष्का अन् प्रभासची जोडी प्रेक्षकांना प्रचंड भावली होती. त्यामुळे ‘साहो’मध्ये ही जोडी पुन्हा एकदा समोर यावी, अशी चाहत्यांची इच्छा होती. परंतु अनुष्का निर्मात्यांच्या अटीवर खरी उतरली नसल्याने तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. त्यामुळे तिची जागा कोण घेणार यावरून सध्या चर्चा रंगली आहे. गेल्या आठवड्यातच या चित्रपटासाठी पूजा हेगडेचे नाव समोर आले होते, परंतु आता आलेल्या माहितीनुसार पूजा हेगडे नव्हे तर बॉलिवूडची लव्हली गर्ल श्रद्धा कपूर प्रभाससोबत रोमान्स करताना दिसणार आहे. 



जेव्हा अनुष्काचा पत्ता कट करण्यात आला तेव्हापासून निर्माते प्रभाससाठी अभिनेत्रीचा शोध घेत होते. आता त्यांचा शोध संपला असून, श्रद्धा कपूर हिचे नाव निश्चित मानले जात आहे. खरं तर ही बातमी प्रभासच्या चाहत्यांसाठी धक्कादायकच म्हणावी लागेल. परंतु एक मात्र खरं की, श्रद्धा सध्या बॉलिवूडमध्ये ज्या पद्धतीने झेप घेत आहे, त्यावरून तिचे समोर आल्यास नवल वाटू नये. त्यामुळे ‘साहो’मध्ये प्रभास आणि श्रद्धा एकत्र आल्यास त्यांना पडद्यावर बघणे प्रेक्षकांना मजेशीर वाटेल, यात शंका नाही. 



काही दिवसांपूर्वीच जेव्हा श्रद्धा तिच्या आगामी ‘हसीना पारकर’ या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी ट्विटरवर तिच्या चाहत्यांसोबत लाइव्ह चॅट करीत होती, तेव्हा तिने प्रभासच्या एका प्रश्नावर त्याला हटके नाव ठेवले होते. त्यावरून श्रद्धा प्रभाससोबत काम करणार काय? यावर बरीचशी चर्चा रंगली होती. मात्र तेव्हा कुठल्याही प्रकारची अधिकृत माहिती समोर आली नसल्याने या चर्चेला पूर्णविराम मिळाला होता. परंतु आता आलेल्या माहितीनुसार श्रद्धाचे नाव निश्चित मानले जात आहे. 



दरम्यान, अनुष्काचा पत्ता कट करण्याचे एकमेव कारण म्हणजे तिचे वाढलेले वजन होय. निर्मात्यांनी तिला दिलेल्या कालावधीत वजन कमी करण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु वजन कमी करण्यात ती अपयशी ठरल्याने तिला चित्रपटातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला होता. आता श्रद्धा आणि प्रभास ही जोडी आॅनस्क्रिन बघताना चाहत्यांना आनंद मिळेल, यात शंका नाही. परंतु केवळ श्रद्धाचे नाव आता बदलले जाऊ नये, ही अपेक्षा जर प्रभासच्या चाहत्यांनी व्यक्त केली तर नवल वाटू नये. 

Web Title: Romance to make 'Bollywood Girl' with Prabhas in 'Saoho'; Anushka Shetty's address cut!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.