रोल लाईक डेझर्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2016 10:16 IST2016-01-16T01:19:11+5:302016-02-09T10:16:54+5:30

दक्षिणेचा मेगास्टार चिरंजीवी मुलाच्या म्हणजेच रामचरणच्या आगामी 'ब्रुस ली - द फायटर' या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहे. ...

Roll Like Desert | रोल लाईक डेझर्ट

रोल लाईक डेझर्ट

्षिणेचा मेगास्टार चिरंजीवी मुलाच्या म्हणजेच रामचरणच्या आगामी 'ब्रुस ली - द फायटर' या चित्रपटात पाहुणा कलाकार म्हणून झळकणार आहे. 'माझी भूमिका चित्रपटाच्या अगदी शेवटी आहे. ही भूमिका म्हणजे चविष्ट जेवण खाल्यानंतर डेझर्ट खाण्यासारखे आहे. माझी ही भूमिका चाहत्यांसाठी एक पर्वणीच आहे, असे चिरंजीवीने सांगितले. जबरदस्त अँक्शन, स्टंटस, फक्कड डान्स आणि गाणी, नेत्रदीपक सेटस हे या चित्रपटात पाहायला मिळणार आहेत.
लिलीचा प्रताप
हॉलिवूड अभिनेता जॉनी डीपची मुलगी लिली रोज हिला धुम्रपान करताना व सेल्फी घेताना पाहिल्याचे वृत्त सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे. आई गायिका वेनेस्सा पेरादिस व अभिनेता पित्याच्या पाऊलावर पाऊल टाकत लिलीने आपल्या अँक्टिंग करिअरला सुरुवात केली आहे. आगामी 'प्लॅनेटेरिअम' या चित्रपटात ती नटाली पोर्टमॅनच्या बहिणीची भूमिका करीत आहे. याच वर्षी मार्च महिन्यात तिने एक मॉडेलिंग काँट्रक्ट केला होता, तेव्हापासून ती चर्चेत आहे.
सकारात्मकता हवी
गायिका डेमी लोवाटोने महिलांना आपल्या शरीराबद्दल सकारात्मक विचार करण्याचा सल्ला दिलाय.
आपली काया व शरीराच्या अन्य अडचणी सोडविण्यासाठी सकारात्मकता, आत्मविश्‍वास व सशक्तपणा असावयास हवा असेही ती म्हणते. डेमीने नुकताच वॅनेटी फे अर मॅगझिनसाठी न्यूड व विना मेकअप फोटोशुट केला आहे. तिचा 'कॉन्फिडंट' हा अल्बम लवकरच प्रदर्शित होणार असून त्यातून डेमीचे खरे आयुष्य समोर येणार आहे.

Web Title: Roll Like Desert

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.