भूमिका चावला कमबॅक

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 6, 2016 14:19 IST2016-01-16T01:13:49+5:302016-02-06T14:19:51+5:30

भूमिका चावला परततेय स लमान खान यांच्या 'तेरे नाम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी भूमिका चावला काही चित्रपट करूनच गायब ...

Role Chawla Comeback | भूमिका चावला कमबॅक

भूमिका चावला कमबॅक

मिका चावला परततेय
स लमान खान यांच्या 'तेरे नाम' चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवणारी भूमिका चावला काही चित्रपट करूनच गायब झाली. परंतु, आता चाहत्यांसाठी एक खुशखबरी आहे. कळाले आहे की, क्रिकेटर महेंद्रसिंग धोनी याच्या जीवनावरील बायोपिक मधून ती कमबॅक करणार आहे. नीरज पांडे निर्देशित या बायोपिकमध्ये भूमिका महत्त्वाच्या रोलमध्ये दिसणार आहे. तिच्यावर एक महत्त्वाचा सिक्वेन्सही चित्रित केला जाणार आहे. भूमिका म्हणाली,' हो मी हा चित्रपट करत आहे. पण, चित्रपटातील माझा रोल याशिवाय मी काहीही सांगू शकत नाही. खुप वर्षांनंतर मी हिंदी चित्रपट करण्यासाठी उत्सुक आहे. ती याअगोदर २00७ मध्ये 'गांधी, माय फादर' मध्ये दिसली होती. त्यानंतर तिने साऊथच्या चित्रपटांकडे दिशा वळवली.

Web Title: Role Chawla Comeback

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.