आथिया शेट्टीला बायोपिकमध्ये करायची भूमिका!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 25, 2017 13:53 IST2017-04-25T07:45:47+5:302017-04-25T13:53:15+5:30

सध्या बॉलिवूडमध्ये ‘बायोपिक’चा ट्रेण्ड आहे. असामान्य व्यक्तिमत्त्वांचा जीवनापट पडद्यावरून साकारून प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखविला जात आहे. राजकारणी, कलाकार, ...

Role of Athiya Shetty in Biopic !! | आथिया शेट्टीला बायोपिकमध्ये करायची भूमिका!!

आथिया शेट्टीला बायोपिकमध्ये करायची भूमिका!!

्या बॉलिवूडमध्ये ‘बायोपिक’चा ट्रेण्ड आहे. असामान्य व्यक्तिमत्त्वांचा जीवनापट पडद्यावरून साकारून प्रेक्षकांना त्यांच्या आयुष्यातील संघर्ष दाखविला जात आहे. राजकारणी, कलाकार, समाजसेवक, खेळाडू आदींच्या जीवनावर बायोपिकची निर्मिती केली जात आहे. जर मला एखाद्या बायोपिकमध्ये काम करण्याची संधी मिळाल्यास त्याचा मी नक्कीच विचार करेल. मात्र अट एकच असेल, ती म्हणजे बायोपिक खेळाडूंच्या जीवनावर आधारित असावी, अशी इच्छा अभिनेत्री आथिया शेट्टी हिने व्यक्त केली. 

नाशिकमध्ये आदित्य बिर्ला फॅशन अ‍ॅण्ड रिटेल लि. च्या ‘पीपल’ दालनाच्या उद्घाटनासाठी आलेल्या आथियाने ‘सीएनएक्स मस्ती’बरोबर संवाद साधला. यावेळी तिने तिच्या आगामी ‘मुबारका’ या चित्रपटाबाबतही सांगितले. आथियाने म्हटले की, या चित्रपटाची कथा प्रत्येक वर्गातील प्रेक्षकांना आवडेल अशी आहे. हा चित्रपट येत्या जुलैमध्ये रिलीज होणार असून, प्रेक्षक त्यास पसंती देतील, असा विश्वास तिने व्यक्त केला. 

आपल्या करिअरविषयी बोलताना आथियाने म्हटले की, स्टारकिड असल्याने अनेक चित्रपटांच्या आॅफर्स चालून येतात ही बाब खरी आहे. मात्र इंडस्ट्रीमध्ये जो कलाकार आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकतो तोच कलाकार इंडस्ट्रीत यशस्वी होतो. त्यामुळे केवळ स्टार किड्स असून, चालणार नाही तर तुमच्यात कौशल्य अन् कलागुणांचीही आवश्यकता असायला हवी, असेही तिने सांगितले. 


 
आथियाने आपल्या डेब्यू ‘हिरो’ या चित्रपटाविषयी बोलताना म्हटले की, मला या चित्रपटातून खूप काही शिकायला मिळाले. कारण पहिल्याच चित्रपटात दिग्गजांबरोबर काम करण्याची संधी मिळाल्याने हा अनुभव माझ्यासाठी अविस्मरणीय असाच आहे. फॅशनबद्दल बोलताना आथियाने सांगितले की, सध्या आपल्या गावात, देशात-विदेशांत काय फॅशन सुरू आहे, याचा विचार करून तरुणाई फॅशनचा ट्रेण्ड फॉलो करते. परंतु मी कधीच या भानगडीत पडली नाही. मनाला पटेल, आवडेल अशीच फॅशन करायला मला आवडते. युवा पिढीनेदेखील स्वत:च्या आवडी-निवडीनुसारच फॅशन करावे, असा सल्लाही आथियाने दिला. 

आपल्या पर्सनल लाइफविषयी बोलताना आथिया म्हणाली की, मला खेळाची प्रचंड आवड आहे. शिवाय मी एक चांगली खवय्याही आहे. कुटुंबातील संस्काराचे मी आजही पालन करते. त्यामुळे धार्मिकतेच्या भावनेतून मी विविध बाबी जोपासत असल्याचेही आथियाने सांगितले. 

Web Title: Role of Athiya Shetty in Biopic !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.