हर्षवर्धन कपूर साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका पडद्यावर

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 6, 2017 11:43 IST2017-09-06T06:13:24+5:302017-09-06T11:43:24+5:30

बॉलिवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शूटर अभिनव बिंद्रावर चित्रपट तयार करण्यात ...

The role of Abhinav Bindra on Harshavardhan Kapoor's role will be on screen | हर्षवर्धन कपूर साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका पडद्यावर

हर्षवर्धन कपूर साकारणार अभिनव बिंद्राची भूमिका पडद्यावर

लिवूडमध्ये सध्या खेळाडूंच्या आयुष्यावर चित्रपट तयार करण्याचा ट्रेंड सुरु आहे. गेल्या अनेक दिवसांपासून शूटर अभिनव बिंद्रावर चित्रपट तयार करण्यात येणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन कपूर अभिनवची भूमिका साकारणार असल्याची चर्चा आहे. हर्षवर्धन कपूरने सोशल मीडियावर ही गोष्ट कंफर्म केले आहे. त्यांने ऑलिम्पिंक गोल्ड मेडल विजेता अभिनव बिंद्रासोबतचा फोटो शेअर केला आहे.     

इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत हर्षवर्धनने या फोटोला कॅप्शनदेखील दिले आहे, ''सुरुवात नेहमीच खास असते जेव्हा तुम्ही अशा एखाद्या व्यक्तीरेखा साकारता ज्या व्यक्तीवर संपूर्ण देशाला गर्व आहे. मला अभिनव बिंद्राची भूमिका मोठ्या पडद्यावर साकारण्याची संधी मिळाली आहे. माझा प्रयत्न असले मी त्याच्या भूमिकेला पूर्ण न्याय देईन''  
अभिनवने बिजिंग ऑल्मिपिंकमध्ये रायफल शूटिंगमध्ये भारताला अभिनव बिंद्राने सुवर्ण पदक जिंकले होते. शूटिंगमध्ये भारताला सुर्वण मिळवून देणारा तो पहिला भारतीय ठरला होता. 2006मध्ये तो रायफल शूटिंगमध्ये विश्व चॅम्पियन ठरला होता.     

'मिर्झिया' चित्रपटातून हर्षवर्धन आणि सयामी खेर यांनी बॉलिवूडमध्ये डेब्यू केला होता. 'मिर्झिया' याचित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा चालला नव्हता. मात्र हर्षवर्धनला त्याच्या बेस्ट डेब्यूचे अॅवॉर्ड मिळाले. हर्षवर्धनच्या पोस्टला त्याचे फॅन्स लाईक करतायेत. अभिनवचे चित्रपटची वाट सगळे आतुरतेने करतायेत. मिर्झियानंतर हर्षवर्धन ‘भावेश जोशी’ या चित्रपटात दिसणार असल्याची चर्चा होती. अनिल कपूरचा मुलगा असल्याने हर्षवर्धनकडून प्रेक्षकांच्या अनेक अपेक्षा होत्या. मात्र पदार्पणात तो त्या पूर्ण करू शकला नाही. त्यामुळे हर्षवर्धन एका हिटच्या शोधात आहे. त्यामुळे हर्षवर्धनच्या आयुष्यावर आधारित तयार होत असलेल्या चित्रपटातून त्याला तो मिळेल अशी आशा करुया.  

Web Title: The role of Abhinav Bindra on Harshavardhan Kapoor's role will be on screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.