रिया सेनने बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत पुण्यात केले लग्न; वाचा सविस्तर वृत्त !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2017 21:02 IST2017-08-17T15:31:07+5:302017-08-17T21:02:33+5:30

अभिनेत्री रिया सेन हिने अखेर बुधवारी बॉयफ्रेंड शिवम तिवारी याच्यासोबत पुण्यात लग्न केले. फारसा गाजावाजा न करता अतिशय साध्या ...

Riya Sen married boyfriend Shivam Tiwari in Pune; Read detailed news! | रिया सेनने बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत पुण्यात केले लग्न; वाचा सविस्तर वृत्त !

रिया सेनने बॉयफ्रेंड शिवम तिवारीसोबत पुण्यात केले लग्न; वाचा सविस्तर वृत्त !

िनेत्री रिया सेन हिने अखेर बुधवारी बॉयफ्रेंड शिवम तिवारी याच्यासोबत पुण्यात लग्न केले. फारसा गाजावाजा न करता अतिशय साध्या पद्धतीने हा विवाहसोहळा पार पडला. वास्तविक रिया आणि शिवमचीच इच्छा होती की त्याच्या लग्नात मोजक्याच पाहुण्यांनी हजेरी लावावी. इंडियन एक्स्प्रेसने दिलेल्या वृत्तानुसार, पुण्यात झालेल्या या लग्नसोहळ्यात दोघांचेही मोजकेच क्लोज फ्रेंड आणि परिवारातील काही सदस्य उपस्थित होते. रिया आणि शिवम लवकरच विवाह बंधनात अडकणार असल्याच्या बातम्या गेल्या काही दिवसांपासून समोर येत होत्या. अखेर बुधवारी त्यांनी साताजन्माच्या गाठी बांधल्या आहेत. 



रिया सेन नुकत्याच तिच्या कमबॅकमुळे चर्चेत आली होती. तिने एकता कपूरच्या वेब सीरीज ‘रागिनी एमएमएस २.२’मधून कमबॅक केले. रियानेच या बातमीला दुजोरा दिला होता, तिने म्हटले होते की, मी डिजिटल मीडियामध्ये पाऊल ठेवले आहे. सध्या रियाचे चाहते तिच्या या नव्या वेब सीरिजमुळे उत्साहित आहेत. तर दुसरीकडे रियाची ही बातमी करोडो चाहत्यांचे मन तोडणारी आहे. असो, रिया आणि शिवम गेल्या काहीकाळापासून एकमेकांना डेट करीत होते. रिया सातत्याने शिवमचे फोटोज् तिच्या सोशल अकाउंटवर शेअर करायची.



रियाच्या चित्रपट करिअरविषयी सांगायचे झाल्यास, तिने आतापर्यंत ‘स्टाइल’, ‘दिल विल प्यार-व्यार’, ‘झंकार बीट्स’, ‘तेरे मेरे फेरे ’ आदी चित्रपटांमध्ये काम केले आहे. त्याव्यतिरिक्त तिने अनेक तामिळ आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केले आहे, तर शिवमविषयी सांगायचे झाल्यास त्याला फोटोग्राफीचा प्रचंड शौक आहे. रियाचे भारतीय चित्रपट सृष्टीशी नाते खूप जुने आहे. कारण तिची आजी सुचित्रा सेन या एक प्रसिद्ध अभिनेत्री होत्या. त्याचबरोबर रियाच्या आई मून मून सेन आणि बहीण राइमा सेन यांचेदेखील इंडस्ट्रीत मोठे योगदान राहिले आहे. असो, रियाने आता वैवाहिक जीवनाला सुरुवात केली असून, याकरिता ‘सीएनएक्स मस्ती’कडून तिला भरपूर शुभेच्छा !

Web Title: Riya Sen married boyfriend Shivam Tiwari in Pune; Read detailed news!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.