भररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ

By ऑनलाइन लोकमत | Published: October 23, 2019 03:32 PM2019-10-23T15:32:53+5:302019-10-23T15:33:36+5:30

रितेशनं भररस्त्यात गाडीतून उतरून असे काही केले की जे पाहून लोकांचा गोंधळ उडाला होता.

Ritesh Deshmukh accepted challange of Akshay Kumar | भररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ

भररस्त्यात गाडीतून उतरून रितेशने केलं असं काही, जे पाहून लोकांचा उडाला गोंधळ

googlenewsNext

हिंदी आणि मराठी सिनेमांमध्ये आपल्या अभिनयाची छाप पाडणाऱ्या रितेश देशमुख वेगवेगळ्या कारणामुळे प्रसिद्धीच्या झोतात येत असतो. सध्या तो त्याचा आगामी चित्रपट 'हाऊसफुल ४'मुळे चर्चेत आला आहे. या चित्रपटाच्या ट्रेलर प्रेक्षकांचा खूप चांगला रिस्पॉन्स मिळतो आहे. आता तो नुकताच चर्चेत आला आहे. त्याने भररस्त्यात गाडीतून उतरून असे काही केले की जे पाहून लोकांचा गोंधळ उडाला होता.

खरेतर अक्षय कुमारने रितेशला रस्त्यावर बाला डान्स करून दाखवायचे चॅलेंज दिले होते. त्यामुळे रितेश भररस्त्यात गाडीतून उतरला आणि गाड्यांच्या मध्ये ये बाला ये बाला असं म्हणत स्टेप मारू लागला आणि हसत गाडीत बसला. मात्र त्याला अचानक असं करताना पाहून बाकीच्या लोकांचा गोंधळ उडाला. 

‘हाऊसफुल’, ‘ग्रँड मस्ती’सारख्या चित्रपटांतून लोकप्रियता मिळवणा-या रितेशला विनोदी भूमिकांसाठी अनेक पुरस्कार मिळाले आहेत. रितेश देशमुख हाऊसफुल 4 सिनेमात झळकणार आहे.  येत्या 25 तारखेला दिवाळीच्या मुहूर्तावर सिनेमा प्रदर्शित होणार आहे. यासह सिनेमात बॉबी देओल, अक्षय कुमार यांच्याही खास भूमिका आहेत. सध्या संपूर्ण स्टारकास्ट प्रमोशनमध्ये बिजी आहे.   


त्याचे फिल्मी करिअर पाहता  रितेश देशमुखने विनोदी व्यक्तिरेखाचा जास्त साकारल्या आहेत. साचेबध्द कामात अडकायचे नसून वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिका साकारण्याची इच्छा असून विनोदी भूमिका करण्याचा कंटाळा आला असल्याचे त्याने म्हटले होते.

याआधी केलेल्या भूमिकांपेक्षा वेगळ्या ठरतील अशा कोणत्या भूमिका कराव्यात हे समजत नसल्याचे रितेशने सांगितले होते. 

Web Title: Ritesh Deshmukh accepted challange of Akshay Kumar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.