रितेश देशमुख म्हणतोय, तर 'माऊली' आपले नाव नाही
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 8, 2018 19:00 IST2018-11-08T19:00:00+5:302018-11-08T19:00:00+5:30
'लय भारी' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे.

रितेश देशमुख म्हणतोय, तर 'माऊली' आपले नाव नाही
'लय भारी' सिनेमाला चांगला प्रतिसाद मिळाल्यानंतर अभिनेता रितेश देशमुख नवीन सिनेमा रसिकांच्या भेटीला घेऊन आला आहे. या चित्रपटाचे नाव आहे 'माऊली'. या चित्रपटाचा टीझर नुकताच प्रदर्शित करण्यात आला आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचा टीझर शाहरुख खानने ट्विटर अकाऊंवरून शेअर केला आहे. दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये जबरदस्त आणि ऍक्शन आणि संवाद ऐकायला मिळत आहेत. या चित्रपटात रितेश एका पोलीस अधिकाऱ्याची भूमिका करत आहे. या सिनेमात रितेशसोबत ‘मिर्झिया’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केलेली अभिनेत्री संयमी खेर या चित्रपटात मुख्य भूमिकेत झळकणार आहे.
जवळपास दीड मिनिटाच्या या टीझरमध्ये जबरदस्त अॅक्शन आणि दमदार संवाद आहेत. ‘आपले नाव ऐकले नाय, असे एक बी गाव नाय अन् हाणल्या बगैर सोडले तर माऊली आपले नाव नाही,’ या संवादाने रितेशची एण्ट्री होते. शाहरुखने रितेशच्या या चित्रपटाचा टीझर शेअर करण्यामागचे कारण म्हणजे त्याच्या झिरो या चित्रपटाशी बॉक्स ऑफीसवर टक्कर टाळण्यासाठी रितेशने माऊलीच्या प्रदर्शनाची तारीख पुढे ढकलली होती. त्यावेळीसुद्धा शाहरुखने ट्विटरवर भावनिक पोस्ट लिहित रितेशचे आभार मानले होते.
Mauli aala re. In which my friend @Riteishd proves, Action does speak louder than words. All the best to the cast & crew of the film. It looks awesome!!#laibhaarimauli#memaulihttps://t.co/CJ4mBgY7gG
— Shah Rukh Khan (@iamsrk) November 8, 2018
'माऊली' या चित्रपटाचे दिग्दर्शन आदित्य सरपोतदार यांनी केले आहे तर निर्मिती जेनेलिया देशमुखने केली आहे. या चित्रपटाला अजय-अतुलच्या संगीताची साथ मिळाली आहे. १४ डिसेंबरला रितेशचा हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. माऊली चित्रपटातील पोलीस अधिकारी रसिकांच्या भेटीला येणार आहे.