रितेश देशमुखने केली होती चोरी, घरी सांगितले होते असे काही; वाचा काय आहे किस्सा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 28, 2017 16:30 IST2017-10-28T10:59:32+5:302017-10-28T16:30:02+5:30

अभिनेता रितेश देशमुख याने चोरी केली असे जर म्हटले तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु हे स्वत: रितेशनेच ...

Riteish Deshmukh had stolen something that was said at home; Read what an episode! | रितेश देशमुखने केली होती चोरी, घरी सांगितले होते असे काही; वाचा काय आहे किस्सा!

रितेश देशमुखने केली होती चोरी, घरी सांगितले होते असे काही; वाचा काय आहे किस्सा!

िनेता रितेश देशमुख याने चोरी केली असे जर म्हटले तर तुमचा कदाचित विश्वास बसणार नाही. परंतु हे स्वत: रितेशनेच सांगितले असून, त्याच्या लहानपणीचा एक किस्सा सांगताना त्याने याबाबतचा उलगडा केला. रितेशने म्हटले की, ‘जेव्हा शाळेत होतो तेव्हा मी एका मुलाच्या स्कूल बॅगमधील स्केच पेन चोरला होता. या चोरीचा पर्दाफाश होऊ नये म्हणून मी घरी खोटं बोललो होतो. त्याचबरोबर ज्या मुलाचा मी स्केच पेन चोरला होता, त्या मुलालादेखील माझ्या घरापासून तब्बल एक वर्ष दूर ठेवले होते. 

‘बॅँक चोर’ या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान त्याने एका वेबसाइटशी बोलताना याबाबतचा खुलासा केला होता. रितेशने म्हटले होते की, ‘जेव्हा मी शाळेत होतो तेव्हा पहिल्यांदा चोरी केली होती. त्यानंतर ती चोरी लपविण्यासाठी मी घरी खोटंही बोललो होतो. त्याचे झाले असे की, माझ्या वर्गातील माझ्या एका मित्राकडे नवे स्केचपेन होते. जे त्याने लंडन येथून मागविले होते. त्यामुळे तो दररोज हे पेन शो-आॅफ करीत होता. तेव्हा मी विचार करीत होतो की, काय करायला हवे? चौथ्याच दिवशी शाळेची सुटी होण्याअगोदर मी त्याच्या बॅगमधून गुपचूप स्केचपेन चोरले. घरी गेल्यानंतर सगळ्यांनीच मला विचारले की हे नवे पेन तुझ्याकडे कसे आले? तेव्हा मी खोटं बोलत म्हटले की, शाळेत कोणाचा तरी बर्थ डे होता. तेव्हा गिफ्ट म्हणून सगळ्यांना काही ना काही दिले. मला स्केचपेन दिले गेले. त्यानंतर मी त्या मुलाला तब्बल एक वर्ष घरी येऊ दिले नाही. तसेच चोरलेले स्केचपेन घेऊन कधी शाळेतही गेलो नाही. 



दरम्यान, ‘बॅँक चोर’ या चित्रपटात रितेशने चोराची भूमिका साकारली होती. त्याचबरोबर विवेक ओबेरॉय, विक्रम थापा आणि रिया चक्रवर्ती यांच्याही प्रमुख भूमिका होत्या. या चित्रपटाच्या प्रमोशनदरम्यान विवेक ओबेरॉयनेदेखील त्याने केलेल्या चोरीचा किस्सा सांगितला होता. विवेकने म्हटले होते की, मला घरात चोरी करताना माझ्या पत्नीने कित्येकदा पकडले आहे. वास्तविक मला चॉकलेट खूप आवडतात. परंतु माझी पत्नी मला चॉकलेट खाऊ देत नसल्याने मी चोरी करून चॉकलेट खाल्ले आहेत. यावरून रितेश आणि आफताब शिवदासानी माझी खिल्ली उडवित असल्याचेही त्याने सांगितले होते. 

Web Title: Riteish Deshmukh had stolen something that was said at home; Read what an episode!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.