हाफ गर्लफ्रेंडमध्ये ऋषी रिचचे गाणे
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2016 14:34 IST2016-09-09T08:55:07+5:302016-09-09T14:34:35+5:30
चेतन भगतच्या कादंबरीवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमाचे सध्या न्यूयॉकला शूटींग सुरू आहे. मोहित सुरी चित्रपटाचे दिग्दर्शन (आशिकी २, ...

हाफ गर्लफ्रेंडमध्ये ऋषी रिचचे गाणे
च तन भगतच्या कादंबरीवर आधारित ‘हाफ गर्लफ्रेंड’ या सिनेमाचे सध्या न्यूयॉकला शूटींग सुरू आहे. मोहित सुरी चित्रपटाचे दिग्दर्शन (आशिकी २, एक व्हिलन फेम) करतोय म्हटल्यावर सिनेमाच्या गाण्यांविषयीसुद्धा खूप उत्सुकता आहे.
प्रसिद्ध म्युझिक प्रोड्यूसर ऋषी रिच चित्रपटासाठी एक गाणं बनवणार आहे, अशी माहिती स्वत: ऋषीने ट्विटरवरून दिली आहे. त्याने पुस्तकाचा फोटो ट्विट करून सांगितले की, ‘हाफ गर्लफ्रेंडमधील गाण्याच्या शूटींगसाठी मी न्यूयॉर्कला जातोय.’
अर्जुन कपूर आणि श्रद्धा कपूर यांच्या प्रमुख भूमिका असलेला हा चित्रपट पुढील वर्षी मे महिन्यात प्रदर्शित होणार आहे. केवळ इंग्लिश बोलता येत नाही म्हणून आयुष्यात मागे राहावे लागलेल्या ‘माधव’ची ही कथा आहे. विशेष म्हणजे ‘२ स्टेटस्’नंतर चेतन भगतच्या पुस्तकावर आधारित अर्जुनचा हा दुसरा सिनेमा आहे.
![Rishi Rich]()