ऋषी कपूर यांची अफवा पसरवणाºयांना तंबी
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2016 19:20 IST2016-03-24T02:20:43+5:302016-03-23T19:20:43+5:30
एकेकाळी बॉलिवूडचे चॉकलेटी हिरो हे बिरूद मिरवणारे ज्येष्ठ अभिनेत शशी कपूर यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाºयांना ऋषी कपूर यांनी आज ...

ऋषी कपूर यांची अफवा पसरवणाºयांना तंबी
ए ेकाळी बॉलिवूडचे चॉकलेटी हिरो हे बिरूद मिरवणारे ज्येष्ठ अभिनेत शशी कपूर यांच्या निधनाच्या अफवा पसरवणाºयांना ऋषी कपूर यांनी आज चांगलीच तंबी दिली. अंकल शशी एकदम ठणठणीत आहे. त्यांच्या प्रकृतीबाबत अफवा थांबतील, अशी आशा आहे, असे टिष्ट्वट करून ऋषी कपूर यांनी संताप व्यक्त केला. आज सकाळपासून टिष्ट्वटरवर शशी कपूर यांच्या निधनाच्या अफवा फिरत होत्या. या अफवा बघून खुद्द ऋषी कपूर यांनाच समोर येत खुलासा करावा लागला. अफवा पसरवणे थांबवा आणि तर्क वितर्क लढवणे बंद करा, अशा परखड शब्दांत अफवा पसरवणाºयांना त्यांनी तंबी दिली. सत्तरीत असलेल्या शशी कपूर यांना गतवर्षी दादासाहेब फाळके पुरस्काराने गौरविण्यात आले होते.
Uncle Shashi Kapoor is doing fine. Hope this ends all the speculation about him. Some rumour mongering is happenin