ऋषी कपूर यांचे कमबॅक; कॅन्सरवर मात करून केले फोटोशूट!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 6, 2019 11:41 IST2019-10-06T11:40:29+5:302019-10-06T11:41:24+5:30
बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता ऋषी कपूर हे कॅन्सर या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले आहे.

ऋषी कपूर यांचे कमबॅक; कॅन्सरवर मात करून केले फोटोशूट!
बॉलिवूडचे चिंटू काका ऊर्फ अभिनेता ऋषी कपूर हे कॅन्सर या आजारातून ठणठणीत बरे झाल्याचे समजतेय. होय, कारण त्यांनी नुकतेच एक फोटोशूट करून घेतले आहे. या माध्यमातून ते त्यांच्या फॅन्सच्या भेटीला आले आहेत. हे फोटोशूट प्रसिद्ध फोटोग्राफर अविनाश गोवारीकर यांनी केले आहे. अविनाश गोवारीकर यांचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. ऋषी कपूर यांच्या फॅन्सकडून या फोटोशूटला चांगलीच पसंती मिळत असल्याचे दिसून येत आहे.
मागील वर्षी सप्टेंबरमध्ये ऋषी कपूर हे उपचारासाठी न्यूयॉर्कला गेले होते. अशातच ते मायदेशी परतले. अलीकडेच त्यांनी शेअर केलेल्या फोटोंवरून मायदेशी परतल्याचा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्ट दिसत होता. ऋषी व नीतू सिंग दोघेही मुंबई एअरपोर्टवर उतरताच मीडियाचे कॅमेरे त्यांच्यावर रोखले गेले होते यावेळी ऋषी कपूर यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघण्यासारखा होता. यावेळी नीतू व ऋषी दोघांनीही हातात हात घालून कॅमेऱ्यांना पोज दिली आणि यानंतर दोघेही आपल्या गाडीत बसून घराकडे रवाना झालेत.
ऋषी कपूर वर्षभरापासून न्यूयॉर्कमध्ये कॅन्सरवर उपचार घेत होते. बराच काळ आपल्या घरापासून दूर असलेल्या ऋषी कपूर यांनी अनेकदा सोशल मीडियाच्या माध्यामातून आपल्या भावनांना वाट करुन दिली होती. याकाळात घरच्या आठवणीने ते अनेकदा हळवे झालेले दिसले. अनेक ट्वीटमध्ये त्यांनी ही भावना बोलून दाखवली होती. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते.