इरफान खानप्रमाणे ऋषी कपूर यांना देखील घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन

By ऑनलाइन लोकमत | Published: April 30, 2020 10:26 AM2020-04-30T10:26:02+5:302020-04-30T10:28:14+5:30

ऋषी कपूर उपचारासाठी न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आईचे अंत्यदर्शन घ्यायला न मिळाल्याने ते खचले होते असे त्यांनी सांगितले होते.

Rishi Kapoor couldn't attend his mother's funeral due to cancer treatment PSC | इरफान खानप्रमाणे ऋषी कपूर यांना देखील घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन

इरफान खानप्रमाणे ऋषी कपूर यांना देखील घेता आले नव्हते आईचे अंत्यदर्शन

googlenewsNext
ठळक मुद्देऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आजारपणामुळे ऋषी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते.

काल रात्री उशिरा अचानक तब्येत बिघडल्याने ऋषी कपूर यांना तातडीने मुंबईतील एचएन रिलायन्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. येथेच त्यांनी अंतिम श्वास घेतला. इरफान पाठोपाठ ऋषी कपूर यांच्या निधनाने बॉलिवूडला मोठा धक्का बसला आहे.


 
ऋषी कपूर यांना २०१८ मध्ये कॅन्सर झाला असल्याचे कळले. त्यानंतरर सप्टेंबर २०१८ मध्ये ते कॅन्सरवरील उपचारासाठी न्यूयॉर्कला रवाना झाले होते. ते न्यूयॉर्कला असताना त्यांची पत्नी अभिनेत्री नितू सिंग सतत त्यांच्यासोबत होती. त्याचसोबत बॉलिवूडमधील अनेक कलाकारांनी तिथे जाऊन त्यांची भेट घेतली होती. उपचारानंतर ११ महिन्याने ऋषी कपूर भारतात परतले होते. त्यावेळी विमानतळावर फोटोग्राफर्सनी त्यांची छबी कॅमेऱ्यात टीपली होती. एवढेच नव्हे तर त्यांनी घरी परतल्यावर ट्विटरद्वारे सर्वांचे आभार मानले होते.  घरी परतलो. ११ महिने ११ दिवस. तुम्हा सर्वांचे खूप आभार, असे त्यांनी लिहिले होते. याशिवाय आजारपणाच्या काळात त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहिलेल्या पत्नी नीतू यांच्याबद्दलही त्यांनी भरभरून लिहिले होते. ‘या कठीण काळात नीतू माझा आधार स्तंभ होती. मी तिचा खूप आभारी आहे,’ असे त्यांनी म्हटले होते. 

ऋषी कपूर न्यूयॉर्कला असताना त्यांच्या आई कृष्णा राज कपूर यांचे निधन झाले होते. आजारपणामुळे ऋषी आपल्या आईच्या अंत्यसंस्कारालाही उपस्थित राहू शकले नव्हते. ऋषी यांच्या आय़ुष्यात त्यांच्या आईची एक खास जागा होते. त्यामुळे आईच्या अंत्यदर्शनाला उपस्थित राहायला न मिळाल्याने त्यांना खूपच वाईट वाटले होते. त्यांच्यासाठी तो काळ अतिशय वाईट होता असे त्यांनी मुलाखतीत सांगितले होते. त्यांनी म्हटले होते की, मी न्यूयॉर्कला गेल्यानंतर दोनच दिवसांत आईचे निधन झाले. मला कॅन्सर झाला असल्याची आईला कल्पना होती. मी भारतात परत यायचा विचार केला होता. पण माझ्या भावाने मला सांगितले की, तू येऊन देखील उपयोग होणार नाही... तोपर्यंत सगळ्या विधी झालेल्या असतील. मी आजारपणामुळे खूपच अशक्त झाल्याने माझ्यात देखील ताकद नव्हती. 

Web Title: Rishi Kapoor couldn't attend his mother's funeral due to cancer treatment PSC

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.