ऋचा चढ्ढाने विमानतळावर असे काही केले की लोकांचे मनोरंजन झाले !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 8, 2017 19:28 IST2017-09-08T13:53:05+5:302017-09-08T19:28:47+5:30

अभिनेत्री ऋचा चढ्ढा काही दिवसांपासून अभिनेता अली फैजल याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. या दोघांचे सध्या त्यांच्या सोशल अकाउंटवर मोठ्या ...

Richa Chadhan made fun of the airport at the airport! | ऋचा चढ्ढाने विमानतळावर असे काही केले की लोकांचे मनोरंजन झाले !!

ऋचा चढ्ढाने विमानतळावर असे काही केले की लोकांचे मनोरंजन झाले !!

िनेत्री ऋचा चढ्ढा काही दिवसांपासून अभिनेता अली फैजल याच्यासोबतच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत आहे. या दोघांचे सध्या त्यांच्या सोशल अकाउंटवर मोठ्या प्रमाणात फोटो बघावयास मिळाले आहेत. वास्तविक ऋचा तिच्या लाइफमध्ये सध्या खूप खूश आहे. शिवाय आयुष्यात शांत आणि सकारात्मक राहायचे असे तिने ठरविले असल्याने ती खूपच कूल झाली आहे. याबाबतचा नुकताच प्रत्ययही आला आहे. जेव्हा ती विमानतळावर लॅण्ड झाली तेव्हा तिला बराच काळ लगेज दिले गेले नाही. अशातही ती खूप शांत राहिली. तिला तब्बल तासभर लगेजसाठी प्रतीक्षा करावी लागली. परंतु यामुळे येणाºया-जाणाºया लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले. 

ेएवढेच नव्हे तर तिने हा किस्सा तिच्या चाहत्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी एक चिलिंग ट्विटही केले. ज्यामुळे सोशल मीडियावरही यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडला. ऋचाने तिचे हे ट्विट त्या एअरलाइन्सलाही टॅग केले, ज्यामध्ये ती प्रवास करून आली होती. ऋचाने ट्विटमध्ये १९८७ मध्ये ‘इज्जत’ नावाच्या चित्रपटातील आशा भोसले यांनी गायिलेल्या गाण्याच्या ओळी लिहिल्या. ‘मेरा कुछ सामान तुम्हारे पास पडा हैं’ अशा शब्दांमध्ये तिने एअरलाइन्सवाल्यांची फिरकी घेतली. ऋचाच्या या ट्विटमुळे नेटकºयांचे चांगलेच मनोरंजन झाले. 

तासभरानंतर जेव्हा ऋचाला तिचे लगेज मिळाले तेव्हा तिने पुन्हा एक ट्विट केले. हे ट्विटदेखील तिने एअरलाइन्सवाल्यांना टॅग केले. ऋचाने तिच्या दुसºया ट्विटमध्ये १९७८ मध्ये आलेल्या ‘डॉन’ या चित्रपटातील गाण्यांच्या ओळी लिहिल्या. ‘जिसका मुझे था इंतजार’ अशा शब्दात तिने पुन्हा एकदा एअरलाइन्सची फिरकी घेतली. बºयाच लोकांनी ऋचाच्या या ट्विटला रिट्विट करीत आपले मनोरंजन केले. काहींनी तर एअरलाइन्सची चूक असल्याचेही म्हटले आहे. ऋचाचा हा कूल अंदाज तिच्या चाहत्यांना आवडला नसेल तरच नवल. 

Web Title: Richa Chadhan made fun of the airport at the airport!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.