ऋचा चढ्ढा पुन्हा पडली प्रेमात? अंगद बेदी नवा बॉयफ्रेन्ड?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2017 10:23 IST2017-07-05T04:53:58+5:302017-07-05T10:23:58+5:30

आपल्या दमदार अ‍ॅक्टिंगसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ऋचा चढ्ढा सध्या चर्चेत आहे, ती तिच्या डेटींगच्या बातम्यांमुळे. होय, ऋचा आणि अंगद ...

Richa Chaddha fell in love? Angad Bedi new boyfriend? | ऋचा चढ्ढा पुन्हा पडली प्रेमात? अंगद बेदी नवा बॉयफ्रेन्ड?

ऋचा चढ्ढा पुन्हा पडली प्रेमात? अंगद बेदी नवा बॉयफ्रेन्ड?

ल्या दमदार अ‍ॅक्टिंगसाठी ओळखली जाणारी अभिनेत्री ऋचा चढ्ढा सध्या चर्चेत आहे, ती तिच्या डेटींगच्या बातम्यांमुळे. होय, ऋचा आणि अंगद बेदी या दोघांच्या डेटींगच्या बातम्या सध्या बॉलिवूडमध्ये चवीने चघळल्या जात आहे. अलीकडे ऋचा व अंगद एका वेब सीरिजमध्ये एकत्र दिसले होते. या वेब सीरिजचे शूटींग संपले. पण ऋचा व अंगदच्या भेटीगाठी मात्र वाढतच गेल्या. अलीकडे हे दोघेही अनेकदा एकत्र दिसू लागले आहेत. ऋचाने नुकतेच घर बदलले. अंगदने ऋचाला या शिफ्टींगमध्ये बरीच मदत केल्याचेही कळतेय. अंगदने ऋचाला काही युनिक फिटनेस फंडे शिकवल्याचेही कळतेय. त्यामुळे अलीकडे ऋचा व अंगद केवळ डिनर वा पार्ट्यांमध्येच नाही तर जिममध्येही एकत्र दिसू लागले आहे. ऋचा व अंगद एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या त्यामुळे जोरात आहेत.



ALSO READ : ऋचा चढ्ढाही आता गाणार!

ऋचाला डेट करण्यापूर्वी अंगद ‘बिग बॉस’ कन्टेस्टंट नोरा फतेही हिला डेट करत होता. गतवर्षी शाहरूख खान व आलिया भट्ट स्टारर ‘डिअर जिंदगी’मध्ये अंगद  दिसला होता. ऋचाचे म्हणाल तर ती सुद्धा यापूर्वी एक नाही तर दोन रिलेशनशिपमध्ये होती. अंगदपूर्वी हुमा कुरेशीचा भाऊ व अभिनेता साकीब सलीम याला ऋचा डेट करत होती. इमरान खान आणि कंगना राणौत यांच्या ‘कट्टी-बट्टी’ या सिनेमाच्या स्क्रिनिंगला ऋचा व साकीब भेटले होते. यानंतर दोघांच्याही डेटींगच्या बातम्यांनी जोर धरला होता. केवळ इतकेच नाही तर त्यापूर्वी फ्रँक गेस्टमबाइड याच्यासोबत ऋचाचे नाव जोडले गेले होते. फ्रेंच डायरेक्टर आणि अ‍ॅक्टर असलेल्या फ्रँकसोबत ऋचाच्या रिलेशनशिपची चर्चा बरीच रंगली होती.  

Web Title: Richa Chaddha fell in love? Angad Bedi new boyfriend?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.