Video : रिया चक्रवर्ती म्हणाली होती, 'रिलेशनशीपमध्ये एक-दीड वर्षांनंतर लोक एकमेकांना..."
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2020 18:39 IST2020-08-20T17:39:09+5:302020-08-20T18:39:45+5:30
रिया चक्रवर्तीसोबत निर्माते महेश भटही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत.

Video : रिया चक्रवर्ती म्हणाली होती, 'रिलेशनशीपमध्ये एक-दीड वर्षांनंतर लोक एकमेकांना..."
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीच्या विरोधात एफआयआर दाखल केली आहे. तर दुसरीकडे सुशांत आत्महत्या प्रकरणाची चौकशी सर्वोच्च न्यायालयाने सीबीआयकडे सोपविली आहे. रिया चक्रवर्तीसोबत निर्माते महेश भट्टही सोशल मीडियावर ट्रोल होत आहेत. काही दिवसांपूर्वी रिया आणि महेश भट यांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. फोटोनंतर आता दोघांचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे.
रिया आणि महेश भट यांचा हा व्हिडीओ जलेबी सिनेमाच्या प्रमोशनच्या दरम्यानचा आहे. ज्यामध्ये रिया प्रेमाविषयीचे तिचे मतं मीडियासमोर बोलताना दिसतेय. या व्हिडिओमध्ये रिया चक्रवर्ती आणि महेश भट यांच्याशिवाय ‘जलेबी’ चित्रपटाचा हिरो वरुण मित्रासुद्धा दिसतो आहे. व्हिडिओमध्ये रिया असं म्हणत आहे की, प्रेमात दीड वर्षानंतर लोक एकमेकांना मारायला सुरुवात करतात. प्रेमात लोक काही महिन्यानंतर बदलून जातात, पण आता प्रेमाविषयी लोकांची विचारसरणी बदलली आहे कारण आजच्या काळात प्रेम खरं आणि गहिरे होते, म्हणूनच मला वाटतं की कदाचित मी संपूर्ण आयुष्य अविवाहित राहणार आहे.
काही दिवसांपूर्वी रिया चक्रवर्तीच्या कॉल डिटेल्समध्ये महेश भट यांचे नाव समोर आले आहे. माहितीनुसार, महेश भट आणि रिया एकमेकांचे निकटवर्तीय आहेत आणि बर्याचदा दोघांमध्ये फोनोवरुन बोलणं व्हायचे.