'टायगर 3'मध्ये इतक्या मिनिटांचा आहे हृतिक रोशन कॅमिओ; या डायलॉगने उडवणार धमाल!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 9, 2023 12:19 PM2023-11-09T12:19:49+5:302023-11-09T12:25:51+5:30

'टायगर ३' चित्रपटात आता हृतिक रोशनचीही धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे.

Revealed The time duration and dialogue of Hrithik Roshan’s scene in Salman Khan's 'Tiger 3' | 'टायगर 3'मध्ये इतक्या मिनिटांचा आहे हृतिक रोशन कॅमिओ; या डायलॉगने उडवणार धमाल!

'टायगर 3'मध्ये इतक्या मिनिटांचा आहे हृतिक रोशन कॅमिओ; या डायलॉगने उडवणार धमाल!

बॉलिवूडचा भाईजान सलमान खान हा सध्या 'टायगर ३' हा चित्रपटामुळे चर्चेत आहे. 'टायगर ३' ची चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. या चित्रपटात किंग खान शाहरुखसह आता हृतिक रोशनचीही धमाकेदार एन्ट्री पाहायला मिळणार आहे. 'टायगर ३' मधील हृतिक रोशनच्या कॅमिओ आणि डायलॉगबद्दल मोठं अपडेट समोर आलं आहे.

'वॉर' सिनेमातील कबीर म्हणजेच हृतिक रोशन हा 'टायगर 3'मध्ये झळकणार आहे. हृतिकने 4 नोव्हेंबर रोजी 'टायगर 3' मधील त्याचे सीक्वेन्स  यशराज स्टुडिओमध्ये शूट केले आहेत. चित्रपटात हृतिक रोशनचा कॅमिओ हा 2 मिनिटे 22 सेकंदांचा असणार आहे. कबीर आणि कर्नल लुथरा यामध्ये दिसणार आहेत. ऐवढेच नाही तर हृतिक रोशनचे डायलॉगही समोर आले आहेत. 

 मीडिया रिपोर्टनुसार, कबीर आणि कर्नल लुथरामधील डायलॉग 'जे मी आता तुझ्याकडे मागतोय...' या वाक्याने सुरू होतो आणि मग हा डायलॉग , 'राक्षसाशी लढता-लढता तु स्वतः राक्षस होशील' यावर संपतो. हृतिक रोशनचा हा सीन 'टायगर 3' मध्ये जोडण्यात आला असून सेन्सॉरशिपनंतर चित्रपटाची लांबी आता 2 तास 36 मिनिटे झाली आहे. तर आधी ती २ तास ३३ सेकंद होती. 'टायगर 3'ला 27 ऑक्टोबरला सेन्सॉर बोर्डाकडून प्रमाणपत्र मिळाले होते. पण यशराज फिल्म्सने बोर्डाला हृतिकसोबतचे सीन पास करण्याची विनंती केली होती. यानंतर सेन्सॉर बोर्डाने ६ नोव्हेंबरला हे सीन पास केले. 

'टायगर 3' मध्ये सलमान खान, कतरिना कैफ, शाहरुख खान, हृतिक रोशन आणि इमरान हाश्मी आहेत. याशिवाय रिद्धी डोगरा, विशाल जेठवा, कुमुद मिश्रा, गवी चहल आणि रेवती हे देखील दिसणार आहेत. चित्रपटाचे बजेट 300 कोटी रुपये आहे. टायगर 3 मधून सलमान खान आणि कतरिना कैफची जोडी अनेक वर्षांनंतर थिएटरमध्ये परतत आहे. या दोघांनी आतापर्यंत 'एक था टायगर' आणि 'टायगर जिंदा है' असे दोन बॅक टू बॅक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत.

Web Title: Revealed The time duration and dialogue of Hrithik Roshan’s scene in Salman Khan's 'Tiger 3'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.