​झाला खुलासा ! बॉलिवूड गायक तोशी आणि शारिब साबरीची भाची आहे ‘ती’ रडणारी मुलगी!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2017 13:47 IST2017-08-23T08:17:07+5:302017-08-23T13:47:49+5:30

काल-परवा सोशल मीडियावर एका चिमुकलीचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. होय, या व्हिडिओतील ही चिमुकली कोण, याचा खुलासा झाला आहे.

Revealed! Bollywood singer Toshi and Sharib Sabari's niece 'She' is crying! | ​झाला खुलासा ! बॉलिवूड गायक तोशी आणि शारिब साबरीची भाची आहे ‘ती’ रडणारी मुलगी!!

​झाला खुलासा ! बॉलिवूड गायक तोशी आणि शारिब साबरीची भाची आहे ‘ती’ रडणारी मुलगी!!

ल-परवा सोशल मीडियावर एका चिमुकलीचा रडतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. तिची आई या चिमुकलीला रागावून शिकवतेयं आणि ही चिमुकली आईला प्रेमाने शिकवं, असे म्हणून रडतेय, असा हा व्हिडिओ होता. हा व्हिडिओ पाहून अनेकांनी संताप व्यक्त केला होता. खुद्द क्रिकेटपटू विराट कोहली आणि शिखर धवन यांनी हा व्हिडिओ आपल्या सोशल अकाऊंटवर शेअर करत, यावर संताप व्यक्त केला होता. प्लीज, मुलांना शिकवताना मारू वा रागावू नका, असे आवाहनही त्यांनी केले होते. याच व्हिडिओसंदर्भात एक बातमी आहे. होय, व्हिडिओतील ही चिमुकली कोण, याचा खुलासा झाला आहे. व्हिडिओत रडत असलेली ही चिमुकली बॉलिवूड गायक तोशी आणि शारिब साबरी यांची भाची आहे. तिचे नाव हयात आहे. शारिब साबरीच्या इन्टाग्राम पेजवरून याबाबतचा खुलासा झाला आहे. या पेजवर या मुलीचे अनेक व्हिडिओ अपलोड आहेत. यात कुठे ती नमाज अदा करताना दिसतेय तर कधी मामासोबत मस्ती करतेय. हे व्हिडिओ शारिबने २०१६ मध्ये अपलोड केलेले दिसताहेत.
 


विराटने त्याच्या सोशल अकाऊंटवर शेअर केलेला व्हिडिओ हयातचा आहे, हे तोशीने मान्य केले आहे. सोबत हयात आमची लाडकी आहे, असे सांगत तिच्यावर कुठलाही दबाव नसल्याचे म्हटले आहे.   विराट व शिखर आमच्या मुलीला ओळखत नाहीत. ती कशी आहे, हे आम्हाला ठाऊक आहे. हयातचा हा व्हिडिओ इतका व्हायरल होईल, याची आम्हाला अजिबात कल्पना नव्हती. व्हाट्सअ‍ॅप फॅमिली ग्रूपमधून तो व्हायरल झाला. हयात किती जिद्दी झालीय, हे सांगण्याचा तिच्या आईचा उद्देश होता. तिच्या आईने तिच्या वडिलांना हा व्हिडिओ पाठवला होता. हयात यात रडतेय. पण ते रडणे केवळ होमवर्कपुरते मर्यादीत होते. कारण तिला होमवर्क न करता खेळायचे होते. हयात केवळ तीन वर्षांची आहे आणि प्रत्येक घरात मुलांचे हट्ट वेगवेगळे असतात. यात काहीही नवे नाही. हयात जिद्दी आहे पण तेवढीच आमची लाडकी आहे, असे तोशीने म्हटले आहे.

Web Title: Revealed! Bollywood singer Toshi and Sharib Sabari's niece 'She' is crying!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.