​अश्लिल कमेंट करणाºयांना नेहाने दिले ‘बिकनी’त उत्तर!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2016 20:30 IST2016-06-12T15:00:32+5:302016-06-12T20:30:32+5:30

अलीकडे नेहा धूपियाने आपला एक फोटो पोस्ट केला होता. यात नेहाची बॅक दिसत होती. यावर काहींनी अश्लील कमेंट केले. ...

Reply to 'Bikini' given to those who have made odd comments! | ​अश्लिल कमेंट करणाºयांना नेहाने दिले ‘बिकनी’त उत्तर!!

​अश्लिल कमेंट करणाºयांना नेहाने दिले ‘बिकनी’त उत्तर!!

ीकडे नेहा धूपियाने आपला एक फोटो पोस्ट केला होता. यात नेहाची बॅक दिसत होती. यावर काहींनी अश्लील कमेंट केले.  आपले विचार बिनधास्तपणे मांडणारी नेहा यावर शांत बसणे शक्यच नव्हते. मग काय, या अश्लिल कमेंट करणाºयांना नेहाने चांगलेच सणसणीत उत्तर दिले. तेही बिकनीतला फोटो पोस्ट करून. बिकनीतला एक फोटो पोस्ट करून नेहाने महिलांबद्दल अभद्र लिहिणाºयांच्या चांगल्याच थोबाडीत हाणली.



नेहाने लिहिले, ‘हॅलो, बघा, मी बीचवर बिकनी घातलीयं. बीचवर जाणारे बहुतेक लोक असे करतात आणि हो मी एक सेल्फीही घेतली आहे. ती सुद्धा पोस्ट करतेय. तुम्ही एखाद्या महिलेला फॉलो करीत असाल तर तिचा अपमान होणार नाही, किमान असा प्रयत्न करा. तिच्या वॉलवर स्वत:ची भडास काढू नका. माझ्याकडे तुम्हाला अनफॉलो करण्याचा, तुमचे कमेंट डिलीट करण्याचा वा त्याविरूद्ध तक्रार करण्याचा आॅप्शन आहे. पण मला हे काहीही करायचे नाही. खरे सांगायचे तर हा बिकनीतला फोटो पोस्ट करून मला फक्त एवढेच सांगायचे आहे की, तुम्ही एखाद्या महिलेचा आदर करू शकत नसाल तर तिच्या फोटोकडे दुर्लक्ष करण्याचा व स्क्रॉल करण्याचा पर्याय तुमच्याकडे आहे. यामुळे तुमचा वेळ आणि ऊर्जा दोन्हीही वाचेल’

 

Web Title: Reply to 'Bikini' given to those who have made odd comments!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.