Remembering SSR : युरोप ट्रीपमध्ये असे काय घडले की, सुशांत सिंग रजपूतला घ्यावी लागली मानसोपचारतज्ञाची मदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 14, 2021 14:21 IST2021-06-14T13:58:12+5:302021-06-14T14:21:50+5:30
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग रजपूत दोन वर्षांपूर्वी युरोपला गेले होते. पण तिथून आल्यावर सुशांत खूप बदलला होता.

Remembering SSR : युरोप ट्रीपमध्ये असे काय घडले की, सुशांत सिंग रजपूतला घ्यावी लागली मानसोपचारतज्ञाची मदत
काही तारखा कधीच विसरता येत नाहीत. बॉलिवूडप्रेमींसाठी 14 जून ही तारीख यापैकीच एक. आजची ही तारीख बॉलिवूडप्रेमींना एक भळभळती जखम देऊन गेली होती. गतवर्षी आजच्याच दिवशी म्हणजे 14 जूनला बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंग राजपूतने (Sushant Singh Rajput) जगाला अलविदा म्हटले होते. शून्यातून विश्व निर्माण करणारा सुशांत अचानक जग सोडून निघून गेला होता. (Sushant Singh Rajput Death Anniversary) कधीकाळी बॅकग्राऊंड डान्सर म्हणून करिअरची सुरुवात करणा-या सुशांतने काळासोबत लीड अॅक्टरपर्यंतचा पल्ला गाठला. आज सुशांतचा पहिला स्मृतीदिन.
रिया चक्रवर्ती आणि सुशांत सिंग रजपूत दोन वर्षांपूर्वी युरोपला गेले होते. पण तिथून आल्यावर सुशांत खूप बदलला होता असे रियाने पोलिसांना सांगितले होते. तिने सांगितले होते की, आम्ही इटलीला पोहोचलो तेव्हा आमच्या रूममध्ये एक वेगळंच स्ट्रक्चर होतं. पुरातत्व चित्रकार फंसीसीको गोया यांचे एक चित्र लटकवले होते. या चित्रामध्ये एक राक्षस एका मुलाला खात होता. हेच चित्र पाहून सुशांत घाबरला. सुशांत वारंवार हेच बोलत होता की या चित्रामध्ये भूत आहे जे की त्याला खाणार आहे. मी माझा भाऊ शौविकबरोबर दुसऱ्या खोलीमध्ये होते.
पण जेव्हा मी परतले तेव्हा पाहिले की सुशांत एका हातात रुद्राक्ष घेऊन होता आणि काही मंत्रपठण करत होता. जेव्हा मी त्याला काय झाले विचारले तेव्हा तो म्हणाला की तो भिंतीवरील चित्रामध्ये लपलेल्या कॅरेक्टरला बघत आहे. तो स्पष्टपणे त्याच्याशी काही बातचीत करत होता. यानंतर मी आणि माझा भाऊ खूप घाबरलो. आम्ही त्याला खोलीतून बाहेर घेऊन गेलो. जेव्हा तो नॉर्मल झाला तेव्हा आम्ही त्याला काय झाले विचारले. सुशांत केवळ एवढंच म्हणाला की ते आश्चर्यकारक होतं.
युरोपहून परतल्यानंतर सुशांत त्याच्या खोलीत एकटा राहू लागला. आतून ओरडण्याचे आणि रडण्याचे आवाज येत असत आणि हे काही दिवस चालले. मग आम्ही त्याला मानसोपचारतज्ञांना दाखवायचा निर्णय घेतला. पण सुशांत कोणत्याच डॉक्टरबरोबर कम्फर्टेबल होत नव्हता, त्यामुळे एकामागोमाग एक डॉक्टर आम्ही बदलत होतो.