​ राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘अक्टूबर’चे ‘तब भी तू...’ गाणे रिलीज! पाहा, व्हिडिओ!!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 28, 2018 15:19 IST2018-03-28T09:49:13+5:302018-03-28T15:19:13+5:30

वरूण धवन आणि बनिता संधू यांचा आगामी चित्रपट ‘अक्टूबर’चे थीम साँग तुम्ही पाहिले. ‘ठहर जा...’ हे दुसरे गाणेही पाहिले. आज या चित्रपटाचे आणखी एक नवे गाणे रिलीज झाले. ‘तब भी तू...’ असे या गाण्याचे बोल आहेत.

Relief Fateh Ali Khan's voice 'October' of 'Tu thou thou ...' the song released! Look, video !! | ​ राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘अक्टूबर’चे ‘तब भी तू...’ गाणे रिलीज! पाहा, व्हिडिओ!!

​ राहत फतेह अली खान यांच्या आवाजातील ‘अक्टूबर’चे ‘तब भी तू...’ गाणे रिलीज! पाहा, व्हिडिओ!!

ूण धवन आणि बनिता संधू यांचा आगामी चित्रपट ‘अक्टूबर’चे थीम साँग तुम्ही पाहिले. ‘ठहर जा...’ हे दुसरे गाणेही पाहिले. आज या चित्रपटाचे आणखी एक नवे गाणे  रिलीज झाले. ‘तब भी तू...’ असे या गाण्याचे बोल आहेत. पाकिस्तानी गायक राहत फतेह अली खान यांनी हे गाणे गायले आहे तर अनुपम राय यांनी या गाण्याला संगीत दिले आहे. हे गाणे तुम्हाला भावूक केल्याशिवाय राहणार नाही. वरूण व बनिता यांच्यावर चित्रीत करण्यात आलेल्या या गाण्यात तुम्हाला दोघांच्या नात्यातील क्लिष्टता, त्यांच्यातील दूरावा, वरूणच्या डोळ्यांतील अश्रू असे सगळे   पाहायला मिळेल.



आज दिल्लीत हे गाणे लॉन्च करण्यात आले. यावेळी वरूण आणि चित्रपटाचे दिग्दर्शक सुजीत सरकार यावेळी हजर होते. ‘सुई धागा’ या चित्रपटातून बे्रक घेऊन वरूण खास या लॉन्चसाठी पोहोचला होता. येत्या १३ एप्रिलला रिलीज होऊ घातलेल्या या चित्रपटात वरूण एका हॉटेल मॅनेजमेंट विद्यार्थ्याच्या भूमिकेत आहे.
 या  चित्रपटात एक वेगळी आणि हटके कथा आपल्याला पाहायला मिळणार आहे. शुजीत यांना  वृत्तपत्रातील एका बातमीवरून या चित्रपटाची कथा सुचली होती. शुजीत  सरकार  ‘पीकू’ या चित्रपटावर काम करीत असताना अचानक वृत्तपत्रातील एका बातमीने त्यांचे लक्ष वेधले होते. याच बातमीने शुजीत यांना त्यांच्या ‘अक्टूबर’ या चित्रपटासाठी एक आगळीवेगळी कथा दिली. शुजीत यांच्या मते, हा एक स्लाइस आॅफ लाइफ चित्रपट असेल. त्यामुळे प्रेक्षकांसाठी हा चित्रपट म्हणजे एक नवा एक्सपीरियन्स असेल.

ALSO READ : भोपाळच्या बसस्टँडवर वरुण धवनसोबत दिसली अनुष्का शर्मा

या चित्रपटातून बनिता संधू बॉलिवूडमध्ये एन्ट्री करतेय. एनआरआय असलेली बनिता लंडनमध्ये राहते.  पंजाबी कुटुंबात जन्मलेली बनिता ११ वर्षांपासून अभिनय करतेय. ‘डबलमिंट’च्या ‘एक अजनबी हसीना से’या गाण्यात ती दिसली होती. यू ट्यूबवरील हे गाणे तब्बल ६० लाख लोकांनी पाहिले होते. यानंतर बनिताने मागे वळून पाहिलेच नाही.

Web Title: Relief Fateh Ali Khan's voice 'October' of 'Tu thou thou ...' the song released! Look, video !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.