‘अक्सर2’चे नवे गाणे रिलीज! पाहा, जरीन खान अन् गौतम रोडेची बोल्ड केमिस्ट्री!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2017 11:40 IST2017-09-07T06:10:34+5:302017-09-07T11:40:34+5:30
गौतम रोडे आणि जरीन खानचा अपकमिंग सिनेमा ‘अक्सर2’चे हॉट गाणे रिलीज झाले आहे. होय, ‘आज जिद कर रहा है दिल...’ असे शब्द असलेल्या या गाण्यात गौतम आणि जरीन दोघांनीही अतिशय बोल्ड दृश्ये दिली आहेत.

‘अक्सर2’चे नवे गाणे रिलीज! पाहा, जरीन खान अन् गौतम रोडेची बोल्ड केमिस्ट्री!!
ग तम रोडे आणि जरीन खानचा अपकमिंग सिनेमा ‘अक्सर2’चे हॉट गाणे रिलीज झाले आहे. होय, ‘आज जिद कर रहा है दिल...’ असे शब्द असलेल्या या गाण्यात गौतम आणि जरीन दोघांनीही अतिशय बोल्ड दृश्ये दिली आहेत.
अरिजीतने गायलेल्या या गाण्याला संगीत दिले आहे मिथूनने. सईद कादरीने लिहिलेल्या या गाण्याचे शब्द मनाचा ठाव घेणारे आहेत. या गाण्याच्या निमित्ताने गौतम रोडे प्रथमच इतक्या बोल्ड रूपात दिसतोय. एवढेच नाही तर गौतम गाण्यात आपली दमदार बॉडी दाखवतानाही दिसतोय. ‘सूर्यपुत्र कर्ण’ आणि ‘सरस्वतीचंद्र’ यासारख्या टीव्ही मालिकांमध्ये दिसलेले गौतम रोडे हा या चित्रपटाद्वारे बॉलिवूडच्या दुसºया इनिंगसाठी सज्ज आहे. या गाण्यात गौतम निगेटीव्ह शेड्समध्ये तर सलमान खानची हिरोईन जरीन बोल्डनेसचा तडका लावताना दिसतोय. ‘हेट स्टोरी3’ फ्लॉप झाल्यानंतर जरीनला या चित्रपटाकडून बºयाच अपेक्षा आहेत.
या गाण्यात जरीन व गौतमची केमिस्ट्री पाहण्यासारखी आहे. रिलीज झालेल्या या गाण्यावरून हा चित्रपट धोका, कट-कारस्थानाने भरलेला आहे, हे तुम्हालाही कळून चुकेल. क्रिकेटपटू एस. श्रीसंत या चित्रपटातून बॉलिवूड डेब्यू करतोय. तो या चित्रपटात एका वकीलाची भूमिका साकारतोय. अनंत महादेवनने दिग्दर्शित केलेला हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होतो आहे.
ALSO READ : अली फजल-जरीन खानचा व्हिडीओत इंटीमेट सीन !
‘आज जिद कर रहा है दिल...’ हे गाणे रिलीज करण्यापूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला होता. युट्यूबवर प्रेक्षकांनी या ट्रेलरला चांगलीच पसंती दिली होती. रिलीजनंतर काही दिवसांत हा ट्रेलर आत्तापर्यंत लाखो लोकांनी पाहिलाय. ‘अक्सर2’ हा चित्रपट इमरान हाश्मी स्टारर ‘अक्सर’चा सीक्वल आहे.