'शानदार'चे 'फनी' गाणे रिलीज
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2016 13:28 IST2016-01-16T01:18:32+5:302016-02-07T13:28:57+5:30
शाहिद कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'शानदार' २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या संदर्भात संपूर्ण टीम ...
(1).jpg)
'शानदार'चे 'फनी' गाणे रिलीज
श हिद कपूर आणि आलिया भट्ट यांचा आगामी चित्रपट 'शानदार' २२ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे. चित्रपटाच्या संदर्भात संपूर्ण टीम उत्सुक आहे. आत्तापर्यंत 'गुलाबो','शाम शानदार' आणि 'नजदीकियाँ' हे गाणे रिलीज झाले आहेत. चित्रपटातील आणखी एक गमतीदार असे गाणे ' नींद ना मुझको आए' गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल ऐकल्यानंतर कळते की, शाहिद-आलिया यांना रात्री झोप न येण्याचा गंभीर आजार आहे, ज्या आजाराला 'इनसोमनिया' म्हणतात. या गाण्यात दोघेही झोप न आल्याने वेळ घालवण्याचे विविध प्रकार शोधत असतात. शाहीदने रात्री १२ वाजता या गाण्याची लिंक टिवटरवर शेअर केली. 'नींद ना मुझको आए' हे गाणे खरंतर १९५८ मधील चित्रपट 'पोस्ट बॉक्स ९९९' चे रिमिक्स व्हर्जन आहे. ज्याला 'शानदार' साठी रिक्रिएट करण्यात आले आहे. या गाण्याच्या चार रात्री शूटिंगसाठी संपूर्ण टीमने हाय डोज कैफीनचे सेवन केले होते.