​बागी 2 : सैनिकाच्या भूमिकेत दिसेल टायगर श्रॉफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 27, 2017 22:02 IST2017-01-27T16:32:51+5:302017-01-27T22:02:51+5:30

बॉलिवूडचा नवा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ याच्या नावावर फारच कमी चित्रपट असले तरी त्याने आपली आगळी वेळगी ओळख निर्माण ...

Rebellion 2: Tiger Shroff to appear as a soldier | ​बागी 2 : सैनिकाच्या भूमिकेत दिसेल टायगर श्रॉफ

​बागी 2 : सैनिकाच्या भूमिकेत दिसेल टायगर श्रॉफ

लिवूडचा नवा अ‍ॅक्शन स्टार टायगर श्रॉफ याच्या नावावर फारच कमी चित्रपट असले तरी त्याने आपली आगळी वेळगी ओळख निर्माण केली आहे. मागील वर्षी रिलीज झालेला टायगरचा बागी या चित्रपटाचा सिक्वलची तयारी निर्माता साजिद नाडियाडवाला यांनी सुरू केली आहे. या चित्रपटात तो सैनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. 

मागील वर्षी रिलीज झालेला टायगर श्रॉफ व श्रद्धा कपूर यांच्या भूमिका असलेला बागी हा चित्रपट प्रेक्षकांना चांगलाच भावला होता. या चित्रपटाच्या यशानंतर साजिद नाडियाडवाला यांनी बागी २ ची प्लॅनिंग सुरू केली असून यात टायगर श्रॉफ प्रमुख भूमिका साकारणार आहे. ही भूमिका एका सैनिकांची असेल असे सांगण्यात येत आहे. बागीमध्ये टायगरने एका अ‍ॅग्री यंग मॅनची भूमिका साकारली होती. हाच टच कायम राखला जाणार असल्याचे सांगण्यात येते. मात्र यात अभिनेत्री श्रद्धा कपूरच असेल का? यावर शिक्कामोर्तब झालेले नाही. बागीमधील दोघांची जोडी चाहत्यांना प्रचंड आवडली होती. 

बागी २मध्ये सैनिकाची भूमिका करण्यासाठी टायगरला आपला लूक चेंज करावा लागू शकतो अशाही चर्चा रंगल्या आहेत. कारण सैनिकासारखी केशरचना करण्यासाठी त्याला आपले केस लहान करावे लागू शकतात. या चित्रपटातील अ‍ॅक्शन सिन्ससाठी त्याला विशेष प्रशिक्षण देण्यात येणार असल्याचेही सांगण्यात येत आहे. हे प्रशिक्षण त्याला टॉनी देणार आहे. टॉनीने शाओलिन सॉकर या चित्रपटासाठी कोरिओग्रॉफी केली आहे. टायगर श्रॉफ हा त्याचा आगामी ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटाची शूटिंग करतो आहे. चित्रपटाचे कथानक डान्सवर आधारित असून त्याच्यासोबत सहकलाकाराच्या भूमिकेत नवाजुद्दीन सिद्दीकी हा असेल. डान्सिंग स्टार होण्यासाठी धडपडणाºया  मुन्नाची ही कथा असून त्याला मायकेल जॅक्सनप्रमाणे डान्स करता यावा असे वाटत असते. दुसरीकडे टायगर आनंद एल रायच्या आगामी चित्रपटात दिसणार असल्याचेही सांगण्यात येते.

Web Title: Rebellion 2: Tiger Shroff to appear as a soldier

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.