तर या कारणामुळे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने ठेवले आहे अंतर

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 3, 2017 15:15 IST2017-11-03T09:45:02+5:302017-11-03T15:15:02+5:30

शाहरुख खानच्या बर्थ डे पार्टीपासून ते पद्मावतीच्या प्रमोशनपर्यंत कुठेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एकत्र दिसत नाही आहेत. ऐवढेच ...

For this reason Ranveer Singh and Deepika Padukone have kept the difference | तर या कारणामुळे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने ठेवले आहे अंतर

तर या कारणामुळे रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणने ठेवले आहे अंतर

हरुख खानच्या बर्थ डे पार्टीपासून ते पद्मावतीच्या प्रमोशनपर्यंत कुठेच दीपिका पादुकोण आणि रणवीर सिंग एकत्र दिसत नाही आहेत. ऐवढेच नाही तर सध्या सगळ्या पार्ट्ंयापासून सुद्धा रणवीर सिंग चार हात लांब आहे. त्यामुळे सध्या दोघांचे ब्रेकअप झाल्याची चर्चा आहे अशातच आणखीन एक नवी गोष्ट समोर आली आहे. 

रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणचा चित्रपट पद्मावती 1 डिसेंबरला रिलीज होणार आहे. चित्रपट रिलीज होण्यासाठी एक महिना बाकी असताना अजूनपर्यंत चित्रपटाची शूटिंग सुरु आहे. ऐवढेच नाही तर रणवीर सिंगचे काही सीन्स शूट करायचे आहेत तसेच त्याच्या एका गाण्याचे शूटिंगसाठी बाकी आहे. त्यामुळे टीमवर कामाचे प्रेशर असणे स्वभाविकच आहे. त्यामुळे त्यांच्या फॅन्ससाठी हि दिलासा देणारी बातमी आहे की त्यांच्या फेव्हरेट जोडीचे ब्रेकअप झालेले नाही आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ही गोष्ट खरी आहे कि नुकतेच डिनर डेटवर गेले असताना दोघांमध्ये वादा-वादी झाली खरी मात्र ती त्यांच्या नात्याला घेऊन नव्हती तर चित्रपटाबाबत होती. 

ALSO READ :  ‘बाहुबली2’ व ‘दंगल’ला मागे टाकत ‘पद्मावती’ रचणार एक अनोखा विक्रम!!

भलेही रणवीर सार्वजनिक कार्यक्रमाच्या ठिकाणी दिसता नसला तर ती ट्वीटरवर एक्टिव्ह आहे.लवकरच पद्मावतीचा दुसरा ट्रेलर सुद्धा रिलीज केला जाणार आहे. रणवीर सिंग या चित्रपटात नकारात्मक भूमिका साकारत आहे. संजय लीला भन्साळी यांचा हा ड्रीम प्रोजेक्ट आहे.  १८० कोटी रुपए खर्चून बनलेला हा चित्रपट एकूण ४५०० स्क्रीन्सवर रिलीज केला जाणार आहे. मेकर्सने ‘पद्मावती’ तब्बल १५० देशांत रिलीज करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय प्रत्यक्षात अमलात आल्यास हा एक मोठा विक्रम असेल. दीपिका यात राणी पद्मावतीची भूमिका साकारणार आहे.  या चित्रपटात तिने तब्बल २० किलोचे दागिने अंगावर चढविले आहेत. त्याचबरोबर तिने जे कपडे घातलेले आहेत, तेदेखील खूप वजनदार आहेत. राणी पद्मावतीचा पती चित्तौडचा राजा रावल रत्न सिंगचा भूमिकेत झळकणार आहे. प्रेक्षक या चित्रपटाच्या रिलीजची आतुरतेने वाट पाहत आहेत. 

Web Title: For this reason Ranveer Singh and Deepika Padukone have kept the difference

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.