या कारणामुळे कविता पौडवाल गेली चित्रपटसृष्टीपासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2017 18:02 IST2017-05-02T12:32:25+5:302017-05-02T18:02:25+5:30

कविता पौडवाल गेली अनेक वर्षं आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत एकापेक्षा एक सरस गाणी गात आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये ...

For this reason, the poem Poudwal is far away from the film industry | या कारणामुळे कविता पौडवाल गेली चित्रपटसृष्टीपासून दूर

या कारणामुळे कविता पौडवाल गेली चित्रपटसृष्टीपासून दूर

िता पौडवाल गेली अनेक वर्षं आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत एकापेक्षा एक सरस गाणी गात आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये नेहमीच तिचे स्टेज शो होत असतात आणि यांना प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळतो. आजवरच्या तिच्या कारकिर्दीविषयी तिच्याशी मारलेल्या गप्पा...

तुझ्या घरातच तुला संगीताचा वारसा लाभला. तू संगीताकडे कधी आकर्षिली गेली?
माझे वडील अरुण पौडवाल हे संगीतकार असल्याने आणि आई अनुराधा पौडवाल गायिका असल्याने लहानपणापासूनच सूर माझ्या कानावर पडायचे. माझे बाबा बप्पी लहिरी यांच्याकडे अॅरेंजर होते. त्यांच्यासोबत मी अनेक रेकॉर्डिंगला जायचे. त्यातूनच माझ्या मनात गायनाविषयी आवड निर्माण झाली. मी केवळ चार वर्षांची असताना संगीत शिकायला सुरुवात केली. सुरेश वाडकर यांचे गुरू पंडित जियालाल वसंत यांच्याकडून मी संगीत शिकत होती. त्यांचे निधन झाल्यावर मी सुरेश वाडकर यांच्याकडून संगीत शिकायला सुरुवात केली. त्यावेळी वांद्र्याला सुरेश वाडकर आम्हाला संगीत शिकवत असत. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांनाच तिथे एकत्र शिकवले जाई. तसेच तिथे अनेक वाद्य असत. तुम्हाला कोणते वाद्य वाजवायचे ते तुम्ही वाजवू शकता असे गुरूजींचे म्हणणे होते. ज्याचा कल ज्या गोष्टीकडे असेल ते त्या गोष्टीकडे वळतील असे ते आम्हाला सांगायचे. तसेच ते रियाज करताना आम्ही त्यांच्या समोर बसत असू. यामुळे आपोआप सगळे सूर, ताल आमच्या कानावर पडायचे.

तुझा चित्रपटसृष्टीतील गायनाचा प्रवास कसा सुरू झाला?
मला ज्यावेळी नीटसे वाचतादेखील येत नसे, तेव्हापासून मी कोरसमध्ये गात असे. एकदा आई एका स्टुडिओत रेकॉर्डिंग करत होती आणि सहज मी तिच्यासोबत गेली होती. त्या चित्रपटाचे संगीत दिग्दर्शक नदीम-श्रवण हे होते. त्यांनी मला गाणार का असे विचारले आणि जुनून या चित्रपटासाठी मी सगळ्यात पहिल्यांदा गायले. मी केवळ 13-14 वर्षांची असताना स्टेजवरदेखील गात असे. मी कॉलेजमध्ये असतानाच अनेक दाक्षिणात्य चित्रपटात गाणी गायली होती. ए.आर.रहमान यांनी संगीत दिलेल्या चित्रपटातदेखील मी गाणी गायली आहेत. कॉलेजमध्ये असताना माझा संगीत प्रवास सुरळीत सुरू असला तरी त्याच्यात मला रस नव्हता. मला डॉक्टर बनवण्याची इच्छा होती. पण माझे फिजिक्स चांगले नसल्याने मी डॉक्टर बनू शकले नाही. मी एक खूप चांगली लेखिका आहे. मी त्याकाळात टी-सिरिज कंपनीच्या अनेक कार्यक्रमांची पटकथादेखील लिहायचे. अशा वेगवेगळ्या पद्धतीने माझे करियर सुरूच होते. 

तू चित्रपटसृष्टीत इतकी कार्यरत असताना चित्रपटसृष्टीपासून दूर कशी गेलीस?
मी माझ्या आईसोबत एका कार्यक्रमासाठी अमेरिकेत गेले होते. तिथले वातावरण मला इतके आवडले की, मी तिथेच काम करायचे ठरवले आणि तेथील एका प्रसिद्ध संशोधन कंपनीत मी रिसर्च असिस्टंट म्हणून काम केले. तिथे सहा महिने काम केल्यानंतर मी इंटरअॅक्टिव्ह मीडियाचा कोर्स केला आणि एका टिव्ही स्टेशनवर काम करायला लागले. तिथे मी जवळजवळ चार-पाच वर्षं होते. संगीत क्षेत्रातील अनेकांची माझी तिथे भेट होत असे. पण अमेरिकेत कायमचा राहाण्याचा माझा विचार नसल्याने मी चार-पाच वर्षांनी ही नोकरी सोडून भारतात परतले. भारतात आल्यावर मी लग्न केले आणि संसारात रमले. यामुळे माझा चित्रपटसृष्टीशी तितकासा संबंध राहिला नाही. 

तू चित्रपटसृष्टीशी संबंधित नसलीस तरी तू तुझे स्टेज शो करतेस असे ऐकले आहे हे खरे आहे का?
हो, मी स्टेज शो करते आणि त्याला रसिकांचा खूप चांगला प्रतिसाद मिळत आहे. भारताच्या उत्तर भागात तर माझे शो नेहमीच होतात. त्याचसोबत मी युट्युबला माझ्या गाण्याचे व्हिडिओ पोस्ट करत असते आणि त्याला चांगले व्ह्यूजदेखील मिळत आहेत. सोशल मीडियामुळे आज लोकांना खूपच चांगले व्यासपीठ मिळाले आहे. मी या व्यासपीठाद्वारे माझी गाणी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहे.

इंडस्ट्रीत गॉडफादर असण्याचा फायदा असतो असे तुला वाटते का?
तुमच्या आई-वडिलांमुळे तुम्हाला सगळेच ओळखत असतात. त्यामुळे तुम्हाला कोणत्याही प्रकारचा त्रास होत नाही. पण तुम्हाला मिळालेल्या संधीनंतर लोकांमध्ये तुम्ही क्लिक झाला नाहीत तर स्ट्रगल हा तुम्हाला करावाच लागतो. 

Web Title: For this reason, the poem Poudwal is far away from the film industry

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.