‘कहानी2’ची रिलीज डेट लांबण्यामागे हे आहे खरे कारण!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 7, 2016 14:15 IST2016-11-07T14:15:34+5:302016-11-07T14:15:34+5:30
विद्या बालन ही लवकरच ‘कहानी २’ या चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला रिलीज ...

‘कहानी2’ची रिलीज डेट लांबण्यामागे हे आहे खरे कारण!!
व द्या बालन ही लवकरच ‘कहानी २’ या चित्रपटात दिसणार आहे. सुजॉय घोष दिग्दर्शित हा चित्रपट येत्या २ डिसेंबरला रिलीज होत आहे. आधी हा चित्रपट २५ नोव्हेंबरला रिलीज होणार होता. नेमक्या याच दिवशी शाहरूख खान आणि आलिया भट्ट यांचा ‘डिअर जिंदगी’ हा चित्रपटही रिलीज होणार होता. साहजिक बॉक्सआॅफिसवर दोन्ही चित्रपटांचा संघर्ष पाहायला मिळाला असता. पण अचानक ‘कहानी २’ रिलीज डेट बदलण्यात आली. बॉक्सआॅफिसवरचा संघर्ष टाळण्यासाठीच ‘कहानी २’ची रिलीज डेट बदलण्यात आली, असेच सर्वांना वाटले. पण यामागचे खरे कारण वेगळेच होते. हे कारण म्हणजे २ डिसेंबर. होय, २ डिसेंबर आणि विद्याचे करिअर याचा एक आगळा-वेगळा संबंध आहे. थोडक्यात सांगायचे तर २ डिसेंबर ही विद्याची ‘लकी डेट’ आहे. विद्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळवून देणारा ‘डर्टी पिक्चर’ याच तारखेला रिलीज झाला होता. २०११ मध्ये २ डिसेंबर ‘डर्टी पिक्चर’ सिनेमागृहांमध्ये झळकला होता आणि तुफान गाजला होता. यानंतर पुढच्याच वर्षी म्हणजे २०१२ मध्ये याच तारखेला ‘कहानी’चा फर्स्ट लूक जारी केला गेला होता. हा चित्रपटही हिट झाला होता. हाच लक फॅक्टर लक्षात घेऊन विद्याने ‘कहानी २’ची रिलीज डेट २ डिसेंबर केल्याचे समजतेय. आता यात किती सत्य ते ठाऊक नाही. पण असे असेल तर विद्याची ही ‘लकी डेट’ ‘कहानी २’च्या मेकर्ससाठी किती ‘लकी’ ठरते, ते पाहणे इंटरेस्टिंग ठरणार आहे.
२०१२ मध्ये विद्याचा ‘कहानी’ हा आला होता. या चित्रपटाने ५४ कोटींची कमाई केली होती. गतवर्षी विद्याचा ‘हमारी अधूरी कहानी’ हा सिनेमा आला. पण बॉक्सआॅफिसवर तो तितकाच दणकून आपटला. यंदा आलेला विद्याचा ‘तीन’ हा चित्रपटही अपयशी ठरला. या यशानंतर आता विद्याला नव्या हिटची गरज आहे.‘कहानी2’ विद्याचे नशीब बदलवते वा नाही, ते बघूच..