प्रिया प्रकाश वारियरला मिळाला रिअल लाइफ टेडी; कडाडून मारली मिठी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2018 19:23 IST2018-05-29T13:53:31+5:302018-05-29T19:23:47+5:30

इंटरनेट सनसनी प्रिया प्रकाश वारियरचा आणखी एक फोटो व्हायरल होत आहे. फोटोमध्ये ती तिच्या रिअल लाइफ टेडीला कडाडून मिठी मारत आहे.

Real Life Teddy gets Priya Prakash Warrior; Hugged hug! | प्रिया प्रकाश वारियरला मिळाला रिअल लाइफ टेडी; कडाडून मारली मिठी!

प्रिया प्रकाश वारियरला मिळाला रिअल लाइफ टेडी; कडाडून मारली मिठी!

ल्या डोळ्यांच्या अदांनी या वर्षी इंटरनेटवर सनसनी निर्माण करणारी व्हायरल गर्ल अभिनेत्री प्रिया प्रकाश वारियर नेहमीच कुठल्या ना कुठल्या कारणांनी सोशल मीडियावर चर्चेत राहताना दिसत आहे. सध्या ती तिच्या आगामी ‘ओरू अदार लव’ या चित्रपटाच्या प्रमोशनमध्ये व्यस्त आहे. याबाबतचे व्हिडीओ आणि फोटोज् ती सातत्याने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवर शेअर करीत आहे. आपली स्माइल आणि अदांनी लोकांना वेड लावणाºया प्रियाने आणखी एक फोटो शेअर केला आहे. तिने तिचा जवळचा मित्र वैशाख पवननचा फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये प्रिया त्याला कडाडून मिठी मारताना दिसत आहे. प्रियाने वैशाखविषयी फोटो कॅप्शनही लिहिले आहे. 
 

प्रियाने वैशाखचा फोटो शेअर करताना लिहिले की, ‘मी खरोखरच खूप भाग्यशाली आहे. कारण मला खºया आयुष्यात टेडी मिळाला आहे. वैशाख पवनन. यावेळी प्रियाने हा फोटो फोटाग्राफलाही टॅग केला. ज्याचे नाव श्रीराज आहे. प्रिया प्रकाशने या अगोदरही चित्रपटासंबंधी बरेचसे व्हिडीओ आणि फोटोज् शेअर केले आहेत. 
 

सध्या प्रियाचा आणखी एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. ज्यामध्ये ती सुपरस्टार कमल हासनबरोबर बघावयास मिळत आहे. या फोटोमध्ये सुपरस्टार मामुटी आणि मोहनलालही बघावयास मिळत आहेत. या इव्हेंटमध्ये प्रियाने त्यांचीही भेट घेतली आहे. तसेच प्रियासोबत ‘रोशन अब्दुल रहूफ’ हा तिचा को-स्टारही दिसत आहे. 
 

दरम्यान, प्रियाच्या ‘ओरू अदार लव’ या चित्रपटास उमर लुलू यांनी दिग्दर्शित केले आहे, तर चित्रपटाला शान रहमानने संगीत दिले आहे. हा चित्रपट याच वर्षी डिसेंबर महिन्यात प्रदर्शित होणार आहे. प्रिया प्रकाशच्या लोकप्रियतेविषयी सांगायचे झाल्यास, इन्स्टाग्रामवर तिच्या फॉलोअर्सची संख्या ६० लाखांपेक्षा अधिक आहे. तिच्याविषयी हेदेखील सांगितले जाते की, ती एका प्रमोशनल पोस्टसाठी आठ लाख रूपयांपर्यंत चार्ज करते. 

Web Title: Real Life Teddy gets Priya Prakash Warrior; Hugged hug!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.