​तयार असा, आला ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक !!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 24, 2017 15:59 IST2017-10-24T10:29:14+5:302017-10-24T15:59:14+5:30

करिना कपूर आणि सोनम कपूर या दोघींच्या ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक अखेर आऊट झाला. अनेक चर्चा, अनेक अफवा ...

Ready, 'Veerre The Wedding' First Look !! | ​तयार असा, आला ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक !!

​तयार असा, आला ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक !!

िना कपूर आणि सोनम कपूर या दोघींच्या ‘वीरे दी वेडिंग’चा फर्स्ट लूक अखेर आऊट झाला. अनेक चर्चा, अनेक अफवा असे सगळे झाले आणि या चर्चांना पुरून उरून चित्रपटाचे पहिले पोस्टर अखेर रिलीज झाले. चमकदार व तेवढाच सुंदर लेहेंगा घातलेल्या चार जणी या पोस्टरवर दिसत आहेत आणि या चार जणींना पाहणे कमालीचे इंटरेस्टिंग आहे. या पोस्टरवर स्वरा भास्कर आणि शिखा तल्सानिया या दोघींचा चेहरे स्पष्ट दिसताहेत. याऊलट पाठमोरी उभी असलेली सोनम कपूर करिना कपूरचा चेहरा पंख्यानी लपवतांना दिसतेय. आपल्या कमबॅक सिनेमाच्या या पोस्टरमध्ये करिना कपूर कमालीची सुंदर दिसतेय, हे अर्थातच सांगायला नकोच.  यापूर्वी करिना ‘की अँण्ड का’मध्ये दिसली होती. यानंतर तैमूरचा जन्म आणि त्याच्या संगोपनात करिना बिझी झाली. पण आता ‘वीरे दी वेडिंग’मधून करिना पुन्हा परततेय. तेहीत्याच जुन्या ग्लॅमरस लूक व फिगरसह. ‘वीरे दी वेडिंग’चे पोस्टर याचा पुरावा आहे. 



हा चित्रपट म्हणजे चार मुलींची कथा आहे. करिनाच्या लग्नाला तिच्या तीन मैत्रिणी येतात आणि मग एकापाठोपाठ एक अशा धम्माल गोष्टी घडतात. महिला आणि त्यांच्या भावना या दाखवल्या जाणार आहेत. सोनम कपूरची बहीण रिया कपूर या चित्रपटाची सहनिर्माती आहे. रिया पहिल्यांदा करिनाकडे या चित्रपटाचा प्रस्ताव घेऊन गेली. तेव्हा करिनाने या चित्रपटाला नकार दिला होता. अलीकडे एका मुलाखतीत खुद्द करिनाने हा किस्सा सांगितला होता. ‘रिया हा चित्रपट घेऊन आली तेव्हा मी प्रेग्नंट होते. खरे सांगायचे तर रियाचा प्रस्ताव माझ्यासाठी धक्काचं होता. या चित्रपटातील भूमिकेत मी फार फिट नाहीय, असे मला त्याक्षणी वाटते. मग काय,माझ्यापेक्षा दहा वषार्ने लहान असलेली दुसरी एखादी हिरोईन निवड,असे मी रियाला स्पष्टपणे सांगितले. मी प्रेग्नंट आहे, याची कल्पनाही तिला दिली. पण रिया मानली नाही. ही महिलांची कथा आहे आणि तुझ्याशिवाय मी कुणालाही घेणार नाही, असे सांगून तिने मला नि:शब्द केले,’ असे करिनाने सांगितले होते.

ALSO READ: -​अन् सोनम कपूरचे पित्त खवळले! मीडियाला लिहिले ओपन लेटर!!
 

Web Title: Ready, 'Veerre The Wedding' First Look !!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.