READ DETAILS : आता वाटेल तिथे, वाटेल तेव्हा बघता येईल ‘बाहुबली2’!!
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 10, 2017 13:42 IST2017-08-10T08:12:53+5:302017-08-10T13:42:53+5:30
आता तुम्ही वाटेल तेव्हा तुमच्या आवडीचा ‘बाहुबली2’ हा सिनोमा पाहू शकाल. होय, भारतीय सिनेमाच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवणारा हा ...

READ DETAILS : आता वाटेल तिथे, वाटेल तेव्हा बघता येईल ‘बाहुबली2’!!
आ ा तुम्ही वाटेल तेव्हा तुमच्या आवडीचा ‘बाहुबली2’ हा सिनोमा पाहू शकाल. होय, भारतीय सिनेमाच्या इतिहासात अभूतपूर्व यश मिळवणारा हा चित्रपट आता तुम्ही आॅनलाईन ‘नेटफ्लिक्स’वर जावून पाहू शकता. तोही कुठल्याही कमर्शिअल बे्रकशिवाय. होय, ‘बाहुबली2’चे दिग्दर्शक एस.एस. राजमौली आणि ‘नेटफ्लिक्स’ यांच्या करार झाला आहे. या चित्रपटाचे आॅनलाईन राईट्स ‘नेटफ्लिक्स’ने २५.५ कोटी रूपयांत खरेदी केले आहेत.
सर्वाधिक मोठ्या बजेटच्या ‘बाहुबली2’ने अनेक विक्रम प्रस्थापित केले आहेत. या देशातील नंबर १ चित्रपटाने आत्तापर्यंत १५०० कोटी रूपयांचा बिझनेस केला आहे. अद्यापही या चित्रपटातील बॉक्सआॅफिसवरील घोडदौड सुरुच आहे. ‘नेटफ्लिक्स’च्या कराराने या चित्रपटाच्या कमाईत आणखी भर घातली आहे. साडे आठ कोटी रजिस्टर्ड मेंबर्स असलेली ‘नेटफ्लिक्स’ ही जगातील सर्वात मोठी इंटरनेट टेलिव्हिजन कंपनी आहे. जगातील १९० देशांतील प्रेच्क ‘नेटफ्लिक्स’वर दररोज १२ कोटी ५० तास टीव्ही शो व चित्रपट पाहतात. ‘नेटफ्लिक्स’चे वैशिष्ट्य म्हणजे, यावर प्रेक्षक वाट्टेल त्यावेळी आपल्या आवडीचा शो वा चित्रपट पाहू शकतात.
‘बाहुबली2’नंतर बॉलिवूडचा एकही सिनेमा बॉक्सआॅफिसवर टिकू शकलेला नाही. ‘बाहुबली2’नंतर बॉलिवूड एका ‘हिट’साठी आसुरलेले आहे. एप्रिल ते ४ आॅगस्टपर्यंत लहान-मोठे मिळून सुमारे ३० बॉलिवूड चित्रपट रिलीज झालेत. मात्र यापैकी कुठल्याही चित्रपटाला बॉक्सआॅफिसवर आपला धाक जमवता आला नाही.सलमान खान, शाहरूख खान अशा बड्या बड्यांचे चित्रपटही दणकून आपटले. सलमान खानचा ‘ट्युबलाईट’ आणि शाहरूख खानचा ‘जब हॅरी मेट सेजल’ या चित्रपटाकडून मोठी अपेक्षा होती. पण या दोन्ही चित्रपटांनी निराशा केली.