‘द मदर’ मधून रवीना टंडन करणार कमबॅक!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2017 18:58 IST2017-01-12T18:58:15+5:302017-01-12T18:58:39+5:30

‘दिलवाले’,‘मोहरा’,‘सत्ता’,‘अंदाज अपना अपना’ या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू इच्छित ...

Raveena Tandon will make a break from 'The Mother'! | ‘द मदर’ मधून रवीना टंडन करणार कमबॅक!

‘द मदर’ मधून रवीना टंडन करणार कमबॅक!

िलवाले’,‘मोहरा’,‘सत्ता’,‘अंदाज अपना अपना’ या सारख्या ब्लॉकबस्टर चित्रपटांमध्ये काम केलेली अभिनेत्री रवीना टंडन आता बॉलिवूडमध्ये पुन्हा एकदा कमबॅक करू इच्छित आहे. ‘द मदर’ या हिंदी चित्रपटातून ती बॉक्स आॅफिसवर भल्याभल्या चित्रपटांना टक्कर देण्यासाठी एकदम सज्ज आहे. महिलाविश्व, त्यांच्या अडचणी, समस्या, केसेस यांच्यावर आधारित हा चित्रपट असून, प्रेक्षकांच्या हृदयाला हात घालणारे कथानक असल्याचे कळतेय. 

अश्तर सय्यद दिग्दर्शित आणि मायकेल पेलिको लिखित हा चित्रपट क्राईम थ्रिलर असा आहे. या चित्रपटात रवीना आईच्या भूमिकेत दिसणार आहे. ‘स्लमडॉग मिलेनियर’ फेम अभिनेता मधूर मित्तल हा या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत दिसेल. अन्याय, अत्याचार आणि बलात्कार या केसेसला न्याय मिळवून देणारा हा चित्रपट असल्याचे सांगण्यात येत आहे. रवीना याबद्दल बोलताना म्हणतात,‘मला चित्रपटाची स्क्रिप्ट फारच योग्य वाटली. महिलांसंबंधीचे कायदे आणि त्याचा वास्तव जीवनातील विरोधाभास यांच्यावर आधारित चित्रपटाचे कथानक आहे. महिलांना संरक्षण देण्यासाठी त्यांच्यासंदर्भातील कायद्यांना आणखी बळकटी देण्याची गरज आहे.’ 

आत्तापर्यंत बॉलिवूडमध्ये महिलांसंदर्भातील बरेच चित्रपट साकारण्यात आले. त्यात ‘लज्जा’,‘कहानी’,‘क्वीन’,‘फॅशन’ अशा अनेक चित्रपटांच्या नावांचा उल्लेख करता येईल. आता ‘द मदर’ या चित्रपटाचाही यात समावेश होणार आहे. समाजात वावरत असताना महिलांना सोसावे लागणारे अन्याय, अत्याचार यांना अटकाव करण्यासाठी अशा चित्रपटांची निर्मिती करण्यात येते. सामाजिक जागृती करण्यासाठी अशा संदेशात्मक चित्रपटांची निर्मिती केली जाते.

Web Title: Raveena Tandon will make a break from 'The Mother'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.