​रोश्मिता हरिमुर्थी जिंकणार का ‘मिस युनिव्हर्स’ चा ताज?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 29, 2017 17:22 IST2017-01-29T08:14:47+5:302017-01-29T17:22:09+5:30

सध्या सगळ्या भारतीयांचे लक्ष ‘मिस युनिव्हर्स’स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाºया रोश्मिता हरिमुर्थी हिच्याकडे लागले आहे.  गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस ...

Rashmita Harimur will win 'Miss Universe' crown? | ​रोश्मिता हरिमुर्थी जिंकणार का ‘मिस युनिव्हर्स’ चा ताज?

​रोश्मिता हरिमुर्थी जिंकणार का ‘मिस युनिव्हर्स’ चा ताज?

्या सगळ्या भारतीयांचे लक्ष ‘मिस युनिव्हर्स’स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणाºया रोश्मिता हरिमुर्थी हिच्याकडे लागले आहे.  गत १७ वर्षांपासून भारताकडे ‘मिस युनिव्हर्स’चा किताब आलेला नाही. त्यामुळेच यंदाचा ‘मिस युनिव्हर्स’ किताब रोश्मिता आपल्याकडे आणणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागले आहे. येत्या ३० जानेवारीला फिलिपाईन्सची राजधानी मनिला येथे या स्पर्धेची अंतिम फेरी रंगणार आहे. या स्पर्धेत रोश्मिताने बाजी मारलीच, तर भारताची गत १७ वर्षांची प्रतीक्षा संपेल. यंदाच्या या स्पर्धेत भारतीय सुंदरी सुश्मिता सेन ही परिक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहे. त्यामुळे तसेही या स्पर्धेवर संपूर्ण भारतीयांच्या नजरा राहणार आहेत.  सन १९९४ साली सुश्मिता सेन आणि सन २००० साली लारा दत्ताने ‘मिस युनिव्हर्स’चा मानाचा किताब पटकावला होता. यंदा या स्पर्धेत रोश्मिता भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे. माजी मिस युनिव्हर्स आणि अभिनेत्री लारा दत्ता हिने रोश्मितासाठी tweet केले असून, तिला मत देण्याचे सर्वांना आवाहन केले आहे. आता ही रोश्मिता कोण, हे जाणून घेण्याची उत्सूकता तुमच्या मनात निर्माण झाली असेल तर तिच्याचबद्दल खास माहिती...


  
रोश्मिता ही मुळची बेंगळुरूची. २२ वर्षांची रोश्मिता ही बेंगळुरूच्या माऊंट कार्मेल कॉलेजची विद्यार्थिनी आहे.  रोश्मिताचे इंग्लिश भाषेवर प्रभुत्व आहेच. पण त्याशिवाय कन्नड भाषाही ती बोलू शकते.

  इंटरनॅशनल बिजनेसची विद्यार्थिनी असलेली रोश्मिता सध्या मास्टर डिग्री करत आहे.



रोश्मिताला सामाजिक कार्याचीही आवड आहे. तिने इको फाउन्डेशन फॉर सस्टेनेबल अल्टरनेटिव्हसाठी एका सरकारी शाळेत शिक्षिका म्हणून काम केले होते. रोश्मिताला नृत्य, बागकाम आणि स्विमिंगची आवड आहे.



रोश्मिताने याआधी ‘यामाहा फेसिनो मिस दिवा २०१६’चा किताब पटकावला होता. याशिवाय  सप्टेंबर २०१६मध्ये आयोजित  ‘मिस इंडिया’ स्पर्धेत १५ स्पर्धकांना मागे टाकत ती ‘मिस इंडिया’ ठरली होती.

Web Title: Rashmita Harimur will win 'Miss Universe' crown?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.