नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मिशन मजनूच्या शूटिंगला केली सुरूवात
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2021 16:01 IST2021-03-05T15:55:13+5:302021-03-05T16:01:54+5:30
सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे.

नॅशनल क्रश असलेली ही अभिनेत्री लवकरच करणार बॉलिवूडमध्ये एन्ट्री, मिशन मजनूच्या शूटिंगला केली सुरूवात
दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री आणि नॅशनल क्रश म्हणून ओळखली जाणारी रश्मिका मंदाना 'मिशन 'मजनू' या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहे. रश्मिकाने सिद्धार्थ मल्होत्रासोबत लखनऊमध्ये या थ्रिलर चित्रपटाचे शूटिंग सुरू केले आहे. जेव्हापासून या चित्रपटाची घोषणा झाली तेव्हापासून हा चित्रपट चर्चेत आला आहे.
या चित्रपटात १९७० पाकिस्तानमधील भारताच्या धाडसी मोहिमेची ही कथा आहे, ज्याने दोन्ही देशांमधील संबंध कायमचे बदलले. परवेज शेख, असीम अरोड़ा आणि सुमित बठेजा यांनी लिहिलेली जासूसी थ्रिलर चित्रपटात सिद्धार्थ मल्होत्रा एक रॉ एजेंट म्हणून काम करताना दिसणार आहे. त्याच्यासोबत अभिनेत्री रश्मिका मंदाना दिसणार आहे. सरीलेरू, नीकेवरू, गीता गोविंदम आणि डिअर कॉमरेडसोबत दाक्षिणात्य सिनेइंडस्ट्रीत उल्लेखनीय आणि अविस्मरणीय सादरीकरण केल्यानंतर आता रश्मिकाच्या बॉलिवूड पदार्पणावर सगळ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
काही दिवसांपूर्वीच रश्मिकाने मुंबईत आपलं नवं घरं घेतलं आहे. प्रोजेक्ट्सच्या तयारीसाठी मुंबई आणि हैदराबाद अशी धावपळ करते आहे. आता तिने मुंबईत आपली जागा बनवली आहे जेणेकरून ती सहज राहू शकते.