बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 11, 2022 13:38 IST2022-10-11T13:37:31+5:302022-10-11T13:38:19+5:30
Goodbye Movie: अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदाना यांच्या गुडबाय चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही.

बॉलिवूडमध्ये फ्लॉप ठरलं रश्मिका मंदानाचं पदार्पण, चौथ्या दिवशी 'गुडबाय'नं कमावले इतके कोटी
अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) आणि रश्मिका मंदाना (Rashmika Mandana) यांच्या 'गुडबाय' (Goodbye Movie) चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर हवा तसा प्रतिसाद मिळताना दिसत नाही. हा चित्रपट निर्मात्यांच्या अपेक्षेनुसार चालत नाही आणि त्याची कमाई दिवसेंदिवस अतिशय संथ गतीने होत आहे. गुडबाय रिलीजच्या पहिल्याच दिवसापासून प्रेक्षकांना प्रभावित करण्यात अपयशी ठरला आहे. वीकेंडमध्येही गुडबाय बॉक्स ऑफिस कलेक्शनमध्ये कोणतीही सुधारणा झाली नाही. पहिल्या तीन दिवसांप्रमाणेच सोमवारी चौथ्या दिवशीही बॉक्स ऑफिसवर गुडबायचे कलेक्शन सरासरी राहिले. चित्रपटाचे कलेक्शन पाहता काही लोक रश्मिकाच्या बॉलिवूडमधील पदार्पणाला फ्लॉप म्हणत आहेत.
रिपोर्ट्सनुसार, गुडबाय रिलीजच्या चौथ्या दिवशी केवळ १ कोटी रुपये कमवू शकला आहे. अशा प्रकारे, गुडबायची कमाई पहिल्या दोन दिवसांप्रमाणे खूपच कमी होती. गुडबायने रिलीजच्या पहिल्याच दिवशी सुमारे दीड कोटी रुपयांची कमाई केली होती. रिलीजच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या दिवशीही त्याचे कलेक्शन जवळपास सारखेच राहिले. अशा प्रकारे, पुष्पा गर्ल रश्मिका मंदाना या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत असूनही, हा चित्रपट प्रेक्षकांवर आपली जादू चालवू शकली नाही असे दिसते.
गुडबाय बॉक्स ऑफिस रिपोर्टनुसार, पहिल्या दिवशी १.५ कोटीचा व्यवसाय केला. तर दुसऱ्या दिवशी १.४० कोटी, तिसऱ्या दिवशी अंदाजे १.८० कोटी रुपयांची कमाई केली आहे. काल म्हणजेच चौथ्या दिवशी अंदाजे ९० लाखांचा बिझनेस केला आहे. अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंदान्ना व्यतिरिक्त गुडबायमध्ये नीना गुप्ता, पावेल गुलाटी, सुनील ग्रोव्हर, साहिल मेहता, एली अवराम, पायल थापा, अभिषेक खान आणि शिविन नारंग यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. रश्मिका मंदान्नाने गुडबायची खूप प्रसिद्धीही केली होती, पण तरीही हा चित्रपट फारशी कमाई करू शकला नाही.